scorecardresearch

रोहित शर्माची भावनिक पोस्ट; म्हणाला, “तुझी उणीव भासेल…”

पाहा नक्की कोणासाठी लिहिला संदेश

(संग्रहित छायाचित्र)
भारतीय संघाने नुकताच ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक विजय मिळवला. ३२ वर्षांपासून अबाधित असलेला ऑस्ट्रेलियाचा गाबाचा गड भारतीयांनी सर केला. अजिंक्य रहाणे आणि रोहित शर्मा यांच्या अनुभवी नेतृत्वाखाली नव्या दमाच्या टीम इंडियाने प्रतिभावान ऑस्ट्रेलियाला धूळ चारली. रोहित सुरूवातीच्या दोन कसोटी सामन्यात संघात नव्हता. पण शेवटच्या दोन सामन्यात त्याच्या पुनरागमनाने संघाला चांगली सुरूवात मिळाली. दमदार विजय नोंदवून रोहित संघासोबत भारतात परतला. मायदेशी आल्यावर त्याने आपल्या पत्नी आणि मुलीची भेट घेतली. पण त्यानंतर बुधवारी मात्र रोहितने एक भावनिक पोस्ट लिहिली.

‘जय मल्हार’मधल्या ‘बानू’ने पोस्ट केला बिकिनीमधला Photo… सर्वत्र जोरदार चर्चा

भारताची आगामी क्रिकेट मालिका इंग्लंडविरूद्ध मायदेशातच असणार आहे. त्यानंतर IPLच्या पुढील हंगामाचे आयोजन केले जाणार आहे. या हंगामासाठी लवकरच लिलाव केला जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर काल सर्व संघांनी आपल्या संघातील करारमुक्त केलेल्या खेळाडूंची नावं BCCIला दिली. त्यात मुंबईच्या संघाने लसिथ मलिंगाला करारमुक्त केले. मलिंगाने क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याने त्याला करारमुक्त करण्यात आले. त्यानंतर रोहितने मोजक्या शब्दात पोस्ट लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या. “क्रिकेट या खेळाला समृद्ध करणारा एक महत्त्वाचा खेळाडू म्हणजे लसिथ मलिंगा. तू खऱ्या अर्थाने मॅचविनर आहेस. संघातील आणि ड्रेसिंग रूममधील तुझा सहवास आणि वावर आम्ही नक्कीच मिस करू. तुझी उणीव भासेल”, असा संदेश त्याने आपल्या इन्स्टाग्रामच्या पोस्टमध्ये लिहिला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rohit Sharma (@rohitsharma45)

IPL 2021: मलिंगा, स्मिथ अन् मॅक्सवेलला संघांकडून ‘बाय-बाय’; पाहा संपूर्ण यादी…

मुंबईने राखून ठेवलेले खेळाडू-

रोहित शर्मा, क्विंटन डी कॉक, सूर्यकुमार यादव, ईशान किशन, ख्रिस लिन, अनमोलप्रीत सिंग, सौरभ तिवारी, आदित्य तारे, कायरन पोलार्ड, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, अनुकुल रॉय, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट, राहुल चहर, जयंत यादव, धवल कुलकर्णी, मोहसीन खान

संघातून करारमुक्त केलेले खेळाडू-

लसिथ मलिंगा, मिचेल मॅक्लेनेघन, जेम्स पॅटिन्सन, नॅथन कुल्टर-नाईल, शेरफाने रूदरफर्ड, प्रिन्स बलवंत राय, दिग्विजय देशमुख

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Rohit sharma gets emotional as mumbai indians release lasith malinga matchwinner see instagram post ipl 2021 vjb

ताज्या बातम्या