scorecardresearch

Rohit Sharma: डीजे मार्टिन गॅरिक्सला रोहितने दिली जर्सी भेट; भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

Rohit Sharma and Martin Garrix: जगातील नंबर वन डीजे मार्टिन गॅरिक्स भारतात आला आहे. त्याने रोहितची भेट घेतली. त्यानंतर या भेटीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Rohit Sharma and Martin Garrix:
रोहित आणि मार्टिन गॅरिक्स (फोटो-इंस्टा)

Rohit Sharma gifted a jersey to Martin Garrix:भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात १७ मार्चपासून एकदिवसीय मालिका (IND vs AUS ODI) सुरू होत आहे. या मालिकेतील पहिला सामना वानखेडे स्टेडियवर खेळला जाणार आहे. परंतु या सामन्यात कर्णधार रोहित शर्माचा टीम इंडियाचा भाग असणार नाही. कारण त्याने पत्नी रितिकाच्या भावाच्या लग्नासाठी सुट्टी घेतली आहे. दरम्यान जगातील नंबर वन डीजे मार्टिन गॅरिक्स भारतात आला आहे. त्याने रोहितची भेट घेतली. त्यानंतर रोहितने त्याला त्याची जर्सी भेट दिली.

सध्या मार्टिन गॅरिक्स भारतात आहे. अलीकडेच त्याने दिल्लीजवळ एक शो देखील केला. ताजमहाल पाहण्यासाठी तो आग्रा येथेही गेले होता. त्याने भारतात ११ दिवसात ९ शो केले. दरम्यान, त्याने रोहित शर्माची भेट घेतली होती. त्यावेळी रोहित शर्माने आपली कसोटी संघाची जर्सी त्याला भेट दिली. त्यानंतर मार्टिन गॅरिक्सने आपल्या इंस्टाग्रामवर या भेटीचे फोटो शेअर केले आहे.

मार्टिन गॅरिक्सने आपल्या सोशल मीडियावर रोहित शर्मासोबतच्या भेटीचे फोटो शेअर केले आहेत. फोटो शेअर करताना गॅरिक्सने कॅप्शनमध्ये लिहिले, तुम्हाला भेटून खूप छान वाटले आणि या भेटवस्तूसाठी (जर्सी) धन्यवाद. रोहित शर्माने त्याची टेस्ट जर्सी गॅरिक्सला भेट दिली. गॅरिक्सने रोहितला त्याच्या काही शोचे व्हिडिओही दाखवले.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाचा २-१ असा पराभव केला. या विजयासह भारताने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. मेव्ह्ण्याचे लग्न असल्याने रोहितने एका सामन्यासाठी ब्रेक घेतला आहे. तो उर्वरित मालिकेतील सामन्यात खेळताना दिसेल.

वनडे मालिकेसाठी भारतीय संघ –

टीम इंडिया: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी, मोहम्मद. सिराज, उमरान मलिक, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, जयदेव उनाडकट.

हेही वाचा – IPL 2023: आरसीबी संघाला मोठा धक्का! १४० षटकार लगावणारा खेळाडू आयपीएलमधून बाहेर

ऑस्ट्रेलिया संघ: स्टीव्ह स्मिथ (कर्णधार) शॉन अॅबॉट, अॅश्टन आगर, अॅलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, मार्नस लॅबुशेन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, झाय रिचर्डसन, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉइनिस, डेव्हिड वॉर्नर आणि अॅडम झाम्पा

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 15-03-2023 at 23:14 IST