IND vs SL Rohit Sharma Death Stare to Arshdeep Singh: भारतीय संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. उभय देशांमधील ३ सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना अनिर्णित राहिला. या रोमांचक सामन्याच्या ४७व्या षटकात टीम इंडियाला विजयासाठी अवघ्या १ धावेची गरज होती. पण ही स्थिती थोडी अवघड होती कारण भारताच्या हातात एकच विकेट होती. याचवेळी क्रीजवर उपस्थित असलेल्या अर्शदीप सिंगने खराब शॉट खेळून सामना बरोबरीत आणला. यानंतर कर्णधार रोहित शर्माही संतप्त दिसला.

हेही वाचा – MS Dhoni: ‘यारी तेरी.. मुझे जिंदगी से भी प्यारी है…’ जोगिंदर शर्माने धोनीला १२ वर्षांनी भेटल्यानंतर शेअर केली खास पोस्ट

IND vs SL: भारताचा सामना टाय झाल्यानंतर रोहित शर्मा भडकला

भारत-श्रीलंकामधील पहिला एकदिवसीय सामना अनिर्णित राहिल्यानंतर भारताच्या डगआऊटमध्ये शांततेचं वातावरण होतं, कारण १४ चेंडूंमध्ये एकही धाव घेता आली नाही आणि अर्शदीप सिंग खराब शॉट खेळत बाद झाला. हा सामना झाल्यानंतर सर्व खेळाडू हात मिळवण्यासाठी मैदानात उतरले. तेव्हा रोहित शर्माने हात मिळवताना अर्शदीपकडे पाहत रागात असा काही जळता कटाक्ष टाकला की अर्शदीपच्या चेहऱ्याचा रंगच उडाला. आता दोघांचे हात मिळवतानाचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये रोहित शर्माचा अर्शदीप सिंगवरचा राग स्पष्टपणे दिसून येतो.

हेही वाचा – IND vs SL: “मी फार काही बोलणार नाही…” १४ चेंडूत एकही धाव न घेता भारताचा सामना टाय झाल्याने रोहित शर्मा पाहा नेमकं काय म्हणाला?

पहिल्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेने टीम इंडियासमोर २३१ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात टीम इंडियाला विजयासाठी १ धावेची गरज होती. पण त्याचवेळेस भारतीय संघाची एकच शेवटची विकेट शिल्लक होती. अर्शदीप सिंग क्रीजवर होता आणि ही १ धाव करण्यासाठी संघाकडे १४ चेंडू बाकी होते. मात्र खराब शॉट खेळून अर्शदीप बाद झाल्याने सामना अनिर्णित राहिला. यानंतर कर्णधार रोहित शर्मा त्याच्यावर रागावलेला दिसत होता. रोहित शर्मा हात मिळवताना त्याच्याकडे पाहत होता. या सामन्यानंतर अर्शदीप सिंगवर सोशल मीडियावर बरीच टीका झाली.

हेही वाचा – Manu Bhaker: “मी स्वत:ला शांत ठेवण्याचा प्रयत्न केला पण…” फायनलमध्ये मनू भाकेर दडपणाखाली होती, मॅचनंतर भावुक होत पाहा काय म्हणाली?

अर्शदीप सिंगला एमएस धोनीप्रमाणे विजयी षटकार मारून त्याला सामना जिंकवून द्यायचा होता, पण त्याच्या बाबतीत नेमके उलटे घडले. सोशल मीडियावर तो चर्चेचा विषय ठरला आहे. त्या एका चुकीच्या शॉटमुळे भारताने सामना गमावला यासह रोहित शर्मा, शिवम दुबेची खेळीही व्यर्थ ठरली. भारतीय संघाच्या ३ सामन्यांची एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना ४ ऑगस्टला आणि तिसरा सामना ७ ऑगस्टला होणार आहे.