Rohit Sharma on Suggestion of Five Test Centers: विराट कोहलीने २०१९ मध्ये भारतात फक्त पाच कसोटी केंद्रे असावीत, असा सल्ला दिला होता. भारत दौऱ्यावर येणाऱ्या संघांना कोणत्या पाच ठिकाणी खेळायचे आहे आणि कोणत्या प्रकारच्या खेळपट्ट्या असतील हेही कळेल, असे तो म्हणाला होते. तो म्हणाला की आम्ही बर्याच काळापासून यावर चर्चा करत आहोत. माझ्या मते पाच कसोटीकेंद्रे असावीत. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेदरम्यान कोहलीचे हे जुने विधान चांगलेच व्हायरल होत आहे. त्याचवेळी भारतीय कर्णधार रोहित शर्माला याबाबत प्रश्न विचारला असता, त्याने कोहलीच्या मताशी असहमती दर्शवली.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत रोहित म्हणाला की, कसोटी क्रिकेट मर्यादित केंद्रांमध्ये न खेळता देशाच्या प्रत्येक भागात खेळले पाहिजे. तो म्हणाला, “जर तुम्हाला कसोटी क्रिकेटला प्रोत्साहन द्यायचे असेल तर ते देशाच्या प्रत्येक भागात खेळले पाहिजे. कसोटी क्रिकेट फक्त काही मोठ्या केंद्रांपुरते मर्यादित नसावे.” तिसरी कसोटी इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर १ मार्चपासून खेळवली जाणार आहे. चार सामन्यांच्या मालिकेत भारताने २-० अशी आघाडी घेतली आहे. दुसरी कसोटी तीन दिवसांतच संपली होती.
अहमदाबादच्या खेळपट्टीबद्दलही मोठं विधान –
रोहित शर्मा म्हणाला, “जर इंदोर कसोटी सामन्याचा निकाल आम्हाला हवा तसा लागला, तर अहमदाबाद कसोटीचा उपयोग डब्ल्यूटीसी फायनलची तयारी म्हणून केला जाण्याची शक्यता आहे. शार्दुल ठाकूर देखील या योजनेचा एक भाग आहे. पण कालच त्याचे लग्न झाले. पण पुढच्या कसोटीत नक्कीच काहीतरी वेगळे करण्याचा विचार आपण करू शकतो.”
कसोटी मालिकेसाठी भारत आणि ऑस्ट्रेलियाचा संघ –
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, केएस भरत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, उमेश यादव, जयदेव उनाडकट.
हेही वाचा – ICC Womens T20 WC 2024 स्पर्धेसाठी ‘या’ आठ संघांनी मिळवली पात्रता; जाणून घ्या कोणते आहेत?
ऑस्ट्रेलिया: स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), अॅश्टन अगर, स्कॉट बोलँड, अॅलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), कॅमेरॉन ग्रीन, पीटर हँड्सकॉम्ब, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लियॉन, लान्स मॉरिस, टॉड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, मिचेल स्टार्क मिशेल स्वेपसन, डेव्हिड वॉर्नर