Rohit Sharma Hundred at Lords IND vs ENG: भारतीय संघाचा हिटमॅन रोहित शर्माने क्रिकेटच्या पंढरीत विक्रमी शतक साकारलं आहे. रोहित शर्माने ८४ चेंडूत आपलं शतक पूर्ण केलं. निवृत्तीच्या चर्चांदरम्यान हिटमॅनने खेळलेली ही शतकी खेळी सर्वांची बोलती बंद करणारं ठरलं. ऐतिहासिक लॉर्ड्सच्या मैदानावर शानदार शतक झळकावून रोहितने केवळ भारताच्या विजयाच्या आशाच जिवंत ठेवल्या नाहीत, तर आपल्या कारकिर्दीत अशा एका विक्रमाचीही नोंद केली जो यापूर्वी कोणत्याही भारतीय फलंदाजाला साधता आला नव्हता.

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या आणि निर्णायक एकदिवसीय सामन्यात रोहित शर्माने ८४ चेंडूंत आपलं शतक पूर्ण केलं. त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील हे ५१ वं शतक ठरलं. या अविस्मरणीय खेळीसह, ‘लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंड’वर एकदिवसीय सामन्यात शतक झळकावणारा तो पहिला भारतीय फलंदाज बनला. जगातील सर्वात प्रतिष्ठित क्रिकेट मैदानांपैकी एक असलेल्या लॉर्ड्सवर अनेक दिग्गज भारतीय खेळाडूंनी अविस्मरणीय खेळी केल्या असल्या, तरी या मैदानावर एकदिवसीय सामन्यात शतकी मजल मारण्याचा पराक्रम करणारा रोहित शर्मा हा पहिलाच खेळाडू ठरला आहे.

मुंबईचा राजा रोहित शर्माची बॅट तळपली

अलीकडच्या काळात रोहित शर्माचे वनडेमधील भविष्य आणि निवृत्तीबाबत सतत चर्चा सुरू होती. मात्र, या स्टार फलंदाजाने कोणत्याही निवेदनाद्वारे नव्हे, तर आपल्या बॅटनेच याला उत्तर दिलं. एका आव्हानात्मक लक्ष्याचा पाठलाग करताना त्याने सुरुवातीपासूनच सावधपणे फलंदाजी केली आणि इंग्लंडच्या गोलंदाजांवर दबाव कायम ठेवला.

इंग्लंडने दिलेल्या ३८७ धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने सावध आणि चांगली सुरूवात केली. रोहित शर्मा व शुबमन गिलच्या जोडीने १४७ धावांची भागीदारी रचत संघासा महत्त्वाची सुरूवात करून दिली. शुबमन गिल ७७ धावा करत बाद झाला. तर मालिकेतील दोन्ही सामन्यात धावांसाठी झगडणाऱ्या रोहित शर्माने तिसऱ्या सामन्यात महत्त्वपूर्ण धावा केल्या.

रोहितने इंग्लंडच्या वेगवान आणि फिरकी गोलंदाजांविरुद्ध बिनधास्त फलंदाजी केली आणि अवघ्या ८४ चेंडूंत शतक पूर्ण करून इतिहास घडवला. रोहितचं हे शतक केवळ एक वैयक्तिक कामगिरी नव्हती, तर भारतीय क्रिकेटसाठीही एक अत्यंत महत्त्वपूर्ण क्षण होता. लॉर्ड्ससारख्या ऐतिहासिक मैदानावर एकदिवसीय सामन्यात शतक झळकावणारा पहिला भारतीय खेळाडू ठरून त्याने आपल्या कारकिर्दीत आणखी एक सुवर्णपान जोडलं. त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील हे ५१ वं शतक होतं आणि या कामगिरीमुळे खेळातील महान फलंदाजांमध्ये त्याचं स्थान अधिकच उंचावलं.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील लॉर्ड्स वनडे सामन्यात एकापेक्षा एक मोठमोठे विक्रम पाहायला मिळत आहेत.

रोहित शर्माने इंग्लंडच्या मैदानावर केलेली शतकं

१२३* विरुद्ध बांगलादेश- बर्मिंगहॅम (२०१७)

१३७* विरुद्ध इंग्लंड- नॉटिंगहॅम (२०१८)

१२२* विरुद्ध दक्षिण आफ्रिका- साऊदॅम्पटन (२०१९)

१४० विरुद्ध पाकिस्तान- मँचेस्टर (२०१९)

१०२ विरुद्ध इंग्लंड- बर्मिंगहॅम (२०१९)

१०४ विरुद्ध बांगलादेश- बर्मिंगहॅम (२०१९)

१०३ विरुद्ध श्रीलंका- लीड्स (२०१९)

… विरुद्ध इंग्लंड लॉर्ड्स (२०२६)