Rohit Sharma Century Celebration: रोहित शर्माने वर्ल्डकप २०२७ स्पर्धेत खेळावं का? रोहितने वनडे क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करावी का? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. रोहितच्या फिटनेसवरून आणि फलंदाजीवरून जोरदार टीका केली जात होती. पण रोहितने दमदार फलंदाजी करून टीका करणाऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघ ४०६ धावांचा डोंगर सर करण्यासाठी मैदानात उतरला होता. या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित आणि शुबमन गिलने तेज तर्रार सुरुवात करून दिली. दरम्यान रोहितने ७२ चेंडूंमध्ये आपल्या वनडे कारकिर्दीतील ३५ वे शतक झळकावले. दरम्यान या शतकी खेळीनंतर केलेल्या सेलिब्रेशनची जोरदार चर्चा रंगली आहे.
हे त्याच्या वनडे कारकिर्दीतील ११ वे शतक आहे. रोहितला फिटनेसवरून अनेकदा ट्रोल केलं गेलं आहे. पण त्याने ही खेळी करून दाखवून दिलं की, मी फिट आहे. दरम्यान शतक पूर्ण करताच त्याने उड्या मारून हटके स्टाईलमध्ये सेलिब्रेशन केलं. रोहित सहसा असं सेलिब्रेशन करत नाही.
वनडे क्रिकेटमध्ये २०० षटकार
यासह रोहित शर्माच्या नावे आणखी एका रेकॉर्डची नोंद झाली आहे. रोहित शर्माने वनडे क्रिकेटमध्ये घरच्या मैदानावर खेळताना २०० षटकार मारण्याचा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. तसेच वनडे क्रिकेटमध्ये त्याने १२००० धावांचा पल्ला देखील गाठला आहे.
शुबमन गिलचं बॅक टू बॅक शतक
आयसीसीच्या वनडे क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या शुबमन गिलची बॅट या सामन्यातही तळपली. गेल्या सामन्यात आव्हान मोठं नव्हतं, पण गिलने शतक झळकावून वेगवान सुरुवात करून दिली होती. गेल्या सामन्यात त्याने ११० धावांची खेळी केली होती. आता दुसऱ्या वनडे सामन्यात ४०६ धावांचा पाठलाग करताना त्याने रोहित शर्मासोबत महत्वपूर्ण भागीदारी केली आणि ६२ चेंडूत आपलं शतक पूर्ण केलं.
वनडे क्रिकेटमध्ये २०० षटकार
यासह रोहित शर्माच्या नावे आणखी एका रेकॉर्डची नोंद झाली आहे. रोहित शर्माने वनडे क्रिकेटमध्ये घरच्या मैदानावर खेळताना २०० षटकार मारण्याचा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. तसेच वनडे क्रिकेटमध्ये त्याने १२००० धावांचा पल्ला देखील गाठला आहे.
