Rohit Sharma reaction after misunderstanding with Ravindra Jadeja : इंग्लंडविरुद्ध शानदार फलंदाजी करणारा सरफराज खान ६२ धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर पॅव्हेलियनमध्ये परतला. सरफराज खान कसोटी पदार्पणाच्या पहिल्या डावात रवींद्र जडेजाच्या चुकीच्या कॉलमुळे धावबाद झाला. हे पाहिल्यानंतर कर्णधार रोहित शर्माही चांगलाच संतापला आणि राग व्यक्त करण्यापासून स्वत:ला रोखू शकला नाही. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

तत्पूर्वी, भारत आणि इंग्लंड यांच्यातील राजकोट कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी सर्फराज खान आणि ध्रुव जुरेल यांनी भारतीय संघात पदार्पण केले. सरफराज खानच्या पदार्पणानंतर वडिलांसह त्याचे सर्व चाहते भावूक झाले होते. यानंतर सरफराज खानला शतक झळकावण्यापासून इंग्लंडचा कोणताही गोलंदाज रोखू शकणार नाही, असे वाटत होते. पण इंग्लंडच्या गोलंदाजांनी नव्हे तर रवींद्र जडेजाच्या चुकीच्या कॉलमुळे सरफराज खानचा डाव अवघ्या ६२ धावांवर संपुष्टात आला आणि तो शतक झळकावण्यापासून दूर राहिला.

Confirmed Rohit Sharma does not stay with Mumbai Indians team in Mumbai
रोहित शर्माने सांगितलं मुंबई इंडियन्सच्या संघासह न राहण्याचं कारण; म्हणाला, “आता माझ्या हातात तर..”
mohammad nabi run out kagiso rabada ishan kishan wicketkeeping win mumbai indians match vs pbks ipl 2024 aggressive celebration rohit sharma haridik pandya and all mi team
VIDEO : नबी-किशनच्या ‘हुशारी’समोर आशुतोष-शशांकची मेहनत वाया; शेवटच्या ओव्हरमध्ये बाजी पालटली आणि जे घडलं…
Michael Vaughan Claims Rohit Sharma to join CSK next year
IPL 2024 : ‘पुढच्या वर्षी रोहित चेन्नईकडून खेळताना दिसणार…’, इंग्लंडच्या माजी कर्णधाराचा मोठा दावा
Shocking video 9 year old girl going to school was attacked by a pitbull dog
VIDEO: भयंकर! चिमुकला अंगणात खेळत होता; इतक्यात पिटबुल कुत्रा आला अन्..आधी हल्ला, मग ओढून नेलं

जडेजाने केला चुकीचा कॉल –

इंग्लंडविरुद्धच्या पदार्पणाच्या सामन्यात शानदार फॉर्ममध्ये असलेल्या सरफराज खानने कसोटीतील पहिले अर्धशतक अवघ्या ४८ चेंडूत झळकावले. त्यानंतर कारकिर्दीतील पहिल्या कसोटीत सर्वात जलद अर्धशतक करणारा तो तिसरा भारतीय फलंदाज ठरला. सरफराज खानने अर्धशतक पूर्ण केल्यानंतरही वेगवान खेळ सुरूच ठेवला होता. मात्र तो ६६ चेंडूत ६२ धावा केल्यानंतर रवींद्र जडेजाच्या केलेल्या चुकीच्या कॉलमुळे धावबाद झाला.

हेही वाचा – IND vs ENG 3rd Test : पदार्पणवीर सरफराज खानने ‘रनआऊट’च्या वादावर सोडले मौन, रवींद्र जडेजाने मान्य केली चूक

सरफराजच्या धावबादबद्दल बोलायचे झाले, तर भारतीय डावातील ८२ वे षटक टाकले जात होते. जडेजा तेव्हा ९९ धावांवर खेळत होता. त्याने षटकातील पाचवा चेंडू थेट मिड-ऑनच्या दिशेने खेळला आणि धाव घेण्यास कॉल केला. पण चेंडू वेगाने वुडकडे जात असल्याचे पाहून जडेजाने धाव घेण्यास नकार दिला. मात्र, जडेजाने धाव घेण्यास नकार दिला, तेव्हा सरफराज खानने अर्धी खेळपट्टी पार केली होती. यानंतर वुडनेही पटकन चेंडू उचलला आणि अचूक थ्रो करुन सरफराजला धाववबाद केले. अशाप्रकारे जडेजाच्या चुकीमुळे सरफराज खान विकेट गमावून पॅव्हेलियनमध्ये परतला.

हेही वाचा – ट्वेन्टी-२० विश्वचषकापर्यंत द्रविडच भारताचा प्रशिक्षक ; ‘बीसीसीआय’चे सचिव जय शहा यांचे वक्तव्य

रोहितनेही व्यक्त केला संताप –

रवींद्र जडेजाच्या चुकीच्या कॉलवर स्वतः कर्णधार रोहित शर्माने नाराजी व्यक्त केली. सरफराज खान धावबाद झाल्यावर ड्रेसिंग रूममध्ये रोहित शर्माने रागाने आपली कॅप काढली आणि खाली आपटली. सरफराज खानच्या धावबादनंतर चाहतेही जडेजाच्या वागण्यावर नाराज दिसले. या घटनेचचा व्हिडीओ सोशळ मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.