विराट कोहली देणार कर्णधारपदाचा राजीनामा? वर्ल्डकपनंतर रोहित शर्मा असणार भारतीय संघाचा कर्णधार!

३२ वर्षीय विराट कोहली, जो सध्या सर्व फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे

Rohit Sharma replace virat kohli indias limited overs captain after t20 world cup report
कोहलीने गेल्या काही महिन्यांपासून रोहित शर्मा आणि संघ व्यवस्थापनाशी या विषयावर दीर्घ चर्चा केली आहे.(फोटो BCCI)

भारतीय क्रिकेट संघात पुढील काही दिवसांत मोठा बदल होण्याची शक्यता आहे. संघाचा सध्याचा कर्णधार विराट कोहली ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये संयुक्त अरब अमिरात आणि ओमानमध्ये होणाऱ्या टी -२० विश्वचषकानंतर एकदिवसीय आणि टी -२० कर्णधारपदावरून पायउतार होण्याची शक्यता आहे. त्यानंतर रोहित शर्माला मर्यादित षटकांमध्ये भारताचा कर्णधार बनवण्याची शक्यता आहे. कोहली हा सर्व प्रकारच्या खेळासाठी भारताचा सध्याचा कर्णधार आहे.

टाईम्स ऑफ इंडियाला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ३२ वर्षीय विराट कोहली, जो सध्या सर्व फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे आणि भारताचा आजपर्यंतचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे, त्याने ३४ वर्षीय रोहित शर्माकडे कर्णधारपदाची जबाबदारी देण्याचा निर्णय घेतला आहे. कोहलीने गेल्या काही महिन्यांपासून रोहित शर्मा आणि संघ व्यवस्थापनाशी या विषयावर दीर्घ चर्चा केली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, तीनही फॉरमॅटमध्ये कर्णधारपदाच्या दबावामुळे कोहलीच्या फलंदाजीवर परिणाम होत आहे. कोहली असेही मानतो की त्याच्या फलंदाजीला सर्व फॉरमॅटमध्ये अधिक वेळ आणि अधिक वेग आवश्यक आहे. विराट स्वतः याची घोषणा करेल. त्याला फलंदाजीवर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे याची जाणीव आहे. त्याला जगातील सर्वोत्तम फलंदाज म्हटले जाते कारण त्याला त्याच्या फलंदाजीबद्दल माहिती आहे. २०२२ ते २०२३ दरम्यान भारताला दोन विश्वचषक (एकदिवसीय आणि टी -२०) खेळायचे आहेत, त्यामुळे कोहलीची फलंदाजी महत्त्वाची मानली जात आहे.

कर्णधार कोहलीला असेही वाटते की सर्व फॉरमॅटमध्ये कर्णधार म्हणून त्याच्या एकूण जबाबदाऱ्या त्याच्या फलंदाजीवर परिणाम करत आहेत. यासाठी त्याने स्वत:ला ताजेतवाने ठेवणे आवश्यक आहे. जर रोहितने मर्यादित षटकांमध्ये संघाचे कर्णधारपद स्वीकारले, तर कोहली कसोटीत भारतीय संघाचे कर्णधारपद तसेच ट्वेंटी २० आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये फलंदाजीवर काम करू शकतो.

महेंद्रसिंह धोनीच्या राजीनाम्यानंतर कोहली २०१४ मध्ये भारतीय संघाचा कसोटी कर्णधार बनला. यानंतर धोनीने २०१७ मध्ये सर्व फॉरमॅटमधील कर्णधारपदाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर कोहलीला कसोटीनंतर टी -२० आणि एकदिवसीय संघाचे कर्णधार बनवण्यात आले. कोहलीने आतापर्यंत ६५ कसोटी सामन्यांचे नेतृत्व केले आहे, ज्यात ३८ जिंकले आहेत. त्याचबरोबर एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने ९५ सामन्यांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे आणि ६५ जिंकले आहेत. कोहलीने ४५ टी -२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले आहे, ज्यात २९ सामने जिंकले आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Rohit sharma replace virat kohli indias limited overs captain after t20 world cup report abn