scorecardresearch

Premium

Team India: कोहली किंवा गिल नव्हे तर ‘हा’ फलंदाज आहे रोहित शर्माचा आवडता बॅटिंग पार्टनर, स्वत: हिटमॅनने केला खुलासा

Rohit Sharma favorite batting partner: भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने एक खुलासा केला आहे. रोहित शर्माने त्याचा आवडता बॅटिंग पार्टनर कोण आहे, याबद्दल त्याने सांगितले आहे. यामध्ये त्याने विराट कोहली किंवा शुबमन गिलचे नाव घेतले नाही.

Rohit Sharma's revelation about batting partner
रोहित शर्माचा आवडत्या बॅटिंग पार्टनरबद्दल खुलासा (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Rohit Sharma revealed that his favorite batting partner is Shikhar Dhawan: भारतीय कर्णधार रोहित शर्माने त्याच्या आवडत्या बॅटिंग पार्टनरबद्दल सांगितले. रोहित शर्माने आपला आवडता बॅटिंग पार्टनर कोण आहे याचा खुलासा केला. भारतीय कर्णधाराने विराट कोहली किंवा शुबमन गिलचे नाव घेतले नाही, तर डावखुरा सलामीवीर शिखर धवनचे नाव घेतले. त्याने धवनला आपला आवडता बॅटिंग पार्टनर म्हणून वर्णन केले. मेन इन ब्लूच्या कर्णधाराने सांगितले की, मैदानावर आणि मैदानाबाहेर धवनसोबत त्याचे चांगले संबंध आहेत.

वृत्तसंस्था ‘आयएएनएस’शी बोलताना रोहित शर्मा म्हणाला, “शिखर आणि माझी मैदानाच्या आत आणि बाहेर खूप घट्ट मैत्री आहे. आम्ही बरीच वर्षे एकत्र खेळलो आहोत आणि ही एक अशी भागीदारी आहे. ज्याचा मी एक भाग बनून आनंद लुटला आहे. त्याच्याकडे संसर्गजन्य ऊर्जा आहे आणि त्याच्या आसपास राहणे खूप मजेदार आहे. सलामीची जोडी म्हणून आम्ही भारतासाठी विक्रम केला आहे.”

Shubman Gill infected with dengue
IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरुद्ध शुबमन गिल खेळणार की नाही? राहुल द्रविडने त्याच्या प्रकृतीबाबत दिली लेटेस्ट अपडेट
Tilak Verma's celebration after scoring a half century celebration
Asian Games: तिलक वर्माने आईला दिलेले वचन केले पूर्ण, जाणून घ्या जर्सी वर करून का केले सेलिब्रेशन? पाहा VIDEO
game changers for Team India in the World Cup 202
World Cup 2023: रोहित, विराट किंवा गिल नव्हे तर ‘हे’ तीन खेळाडू विश्वचषकात भारतासाठी असतील गेम चेंजर्स, युवराज सिंगने केले भाकीत
Aakash Chopra expresses concern over Ravindra Jadeja's bowling ahead of World Cup Said Strike rate has come down in ODIs
Aakash Chopra: विश्वचषकापूर्वी आकाश चोप्राने रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीबाबत व्यक्त केली चिंता; म्हणाला, “वन डे मध्ये स्ट्राईक रेट…”

रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी एकदिवसीय सामन्यात ११७ वेळा एकत्र खेळले आहेत, ज्यामध्ये त्यांनी ५१९३ धावा केल्या आहेत. तर कोहली आणि रोहित शर्मा यांनी एकदिवसीय सामन्यात ८६ वेळा एकत्र फलंदाजी केली आहे, ज्या दरम्यान दोघांनी ५००८ धावा केल्या आहेत. गेल्या काही काळापासून रोहित शर्मा संघाचा युवा सलामीवीर शुबमन गिलसह सलामीवीराची जबाबदारी सांभाळत आहे.

हेही वाचा – Asian Games 2023: भारतीय महिला संघाने नेमबाजीत १० मीटर रायफलमध्ये पटकावले रौप्यपदक

रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी चॅम्पियन्स ट्रॉफी २०१३ द्वारे प्रथमच जोडी म्हणून आपले स्थान निर्माण केले. यानंतर दोघेही बराच वेळ एकत्र खेळले. सलामीची जोडी म्हणून या दोघांनी एकदिवसीय सामन्यांमध्ये भारतासाठी अनेक पराक्रम केले. मात्र, सध्या धवन भारतीय संघाच्या बाहेर आहे. रोहित शर्मा संघाचे नेतृत्व करत आहे. धवनने डिसेंबर २०२२ मध्ये भारतासाठी शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता, जेव्हा रोहित शर्मा आणि शिखर धवन शेवटच्या वेळी जोडी म्हणून खेळताना दिसले होते.

हेही वाचा – Asian Games 2023: दुखापतीमुळे करु शकला नाही सराव तरीही अरविंदने देशासाठी पटकवाले पदक, रोइंगमध्ये भारताची शानदार हॅट्ट्रिक

यावर्षी मायदेशात खेळल्या जाणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत धवन भारतीय संघाचा भाग नाही. मागील २०१९ च्या हंगामात, धवनचा वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियामध्ये समावेश करण्यात आला होता. यावेळी शुबमन गिलची सलामीवीर म्हणून निवड करण्यात आली आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Rohit sharma revealed that his favorite batting partner is shikhar dhawan in indian team vbm

First published on: 24-09-2023 at 15:22 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×