Rohit Sharma revealed why Cheteshwar Pujara was dropped from the Test series: भारतीय संघ सध्या वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर आहे. जिथे टीम इंडिया दोन कसोटी, तीन वनडे आणि पाच टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. १२ जुलैपासून (बधवार) दोन्ही संघांमध्ये कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळवला जाणार आहे. संघ निवडकर्त्यांनी या दौऱ्यात अनेक नवीन खेळाडूंना संधी दिली आहे. त्याचबरोबर चेतेश्वर पुजाराला या मालिकेतून का वगळले, याबद्दल कर्णधार रोहित शर्माने खुलासा केला आहे.

बऱ्याच दिवसांपासून फ्लॉप ठरलेल्या चेतेश्वर पुजाराला या मालिकेत टीम इंडियातून वगळण्यात आले आहे. पुजाराच्या जागी यशस्वी जैस्वालला संघात संधी देण्यात आली आहे. मात्र रोहित शर्माने नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत पुजाराच्या ऐवजी जयस्वालला संघात संधी का मिळाली हे स्पष्ट केले आहे.

रोहित शर्माने खुलासा केला –

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी सामन्यापूर्वी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्याने टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या. त्याने असेही सांगितले की यशस्वी जैस्वाल वेस्ट इंडिजविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळणार असून तो त्याच्यासोबत सलामी करताना दिसणार आहे. शुबमन गिल तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करेल असेही रोहितने सांगितले. याआधी चेतेश्वर पुजारा टीम इंडियाच्या संघात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करायचा.

हेही वाचा – IND vs WI 1st Test: रोहित शर्माने कसोटी पदार्पणापूर्वी यशस्वी जैस्वालला दिला खास सल्ला; म्हणाला, ‘हा एक…’

रोहित शर्माने पत्रकार परिषदेत स्पष्ट केले की, टीम इंडियाला आघाडीच्या फळीतील एका डावखुऱ्या फलंदाजाची दीर्घकाळ गरज होती. जो त्याला यशस्वी जैस्वालच्या रूपाने दिसतो. यशस्वी जैस्वालने फॉर्ममध्ये असलेल्या डावखुऱ्या फलंदाजाच्या रुपाने प्रभावित केले आहे. गिलला स्वतः तिसर्‍या क्रमांकावर फलंदाजी करायची होती, असेही तो म्हणाला.

रोहित म्हणाला की गिल त्याच्याकडे आला आणि त्याला सांगितले की त्याने आपल्या संपूर्ण कारकिर्दीत तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी केली आहे. त्यामुळे जर त्याने टीम इंडियासाठी त्या क्रमांकावर फलंदाजी केली, तर तो चांगली कामगिरी करू शकतो. पुजाराला संघातून वगळण्यामागे कुठेतरी हे कारण असू शकते, जेणेकरून टीम इंडिया शीर्ष क्रमात हे बदल करू शकेल.