Rohit Sharma’s press conference: इंदोर कसोटीपूर्वी केएल राहुलला उपकर्णधारपदावरून हटवल्याबद्दल रोहित शर्माने प्रथमच प्रतिक्रिया दिली. उपकर्णधारपदावरून हटवण्याचा दुसरा अर्थ काढू नये, असे त्याने सामन्यापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. याआधी, जेव्हा निवडकर्त्यांनी उर्वरित दोन कसोटी सामन्यांसाठी संघाची घोषणा केली, तेव्हा त्यात केएल राहुलचे नाव होते, परंतु त्याला उपकर्णधारपदावरून वगळण्यात आले होते.

यानंतर काही माजी क्रिकेटपटूंनी केएल राहुलवर प्रतिक्रिया देताना सांगितले की, त्याला उपकर्णधारपदावरून हटवण्याचा अर्थ असा आहे की इंदूर कसोटीत शुभमन गिलला संधी मिळेल. रोहित शर्माने केएल राहुलच्या संघातील स्थानाबद्दलही सांगितले. रोहित शर्मा म्हणाला की उपकर्णधारपद काढून घेतल्याने खेळाडूला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळणार की नाही, याने काही फरक पडत नाही.

Rr Vs Gt Ipl 2024 Sanju Samson 50th Match As Captain
RR vs GT : संजू सॅमसनने ५०व्या सामन्यात केला खास पराक्रम, ‘या’ बाबतीत रोहित शर्मासह तीन कर्णधारांना टाकले मागे
Despite the efforts of PR Sreejesh the Indian hockey team lost
श्रीजेशच्या प्रयत्नांनंतरही भारतीय हॉकी संघाचा पराभव
IPL 2024 What Was That Thing on MS Dhoni Strapped on His Ankle
IPL 2024: मॅचनंतर धोनीच्या पायाला काय बांधण्यात येतं?
Mohit Sharma on Ravi Shastri's Comment
GT vs SRH : वयांवरुन खिल्ली उडवणाऱ्या रवी शास्त्रींना मोहित शर्माचे चोख प्रत्युत्तर; म्हणाला, ‘माझं वय वाढतंय…’

भारतीय कर्णधार म्हणाला, “गेल्या सामन्यानंतरही मी ते बोललो होतो. जेव्हा एखादा खेळाडू कठीण काळातून जात असतो, तेव्हा कोणत्याही संभाव्य व्यक्तील स्वत:ला सिद्ध करण्यासाठी पुरेसा वेळ दिला जातो. उपकर्णधार असणं किंवा उपकर्णधार नसणं हे काही सांगू शकत नाही. ज्या वेळी तो उपकर्णधार होता, त्यावेळेस तो बहुधा सर्वात वरिष्ठ होता. त्याची उपकर्णधारपदावरून हकालपट्टी केल्याने काहीही सूचित होत नाही.” रोहितचे विधान काही प्रमाणात खरेही आहे. कारण टीम इंडियाने यापूर्वी अजिंक्य रहाणेला उपकर्णधार असतानाही प्लेइंग इलेव्हनमधून वगळले होते.

अहमदाबादच्या खेळपट्टीबद्दलही मोठं विधान –

रोहित शर्मा म्हणाला, “जर इंदोर कसोटी सामन्याचा निकाल आम्हाला हवा तसा लागला, तर अहमदाबाद कसोटीचा उपयोग WTC फायनलची तयारी म्हणून केला जाण्याची शक्यता आहे. शार्दुल ठाकूर देखील या योजनेचा एक भाग आहे. पण कालच त्याचे लग्न झाले. पण पुढच्या कसोटीत नक्कीच काहीतरी वेगळे करण्याचा विचार आपण करू शकतो.”

हेही वाचा – VIDEO: एक धावेनी विजय मिळवल्याने न्यूझीलंडने केला एकच जल्लोष; अँडरसन एकटक पाहतच राहिला

तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीसाठी भारतीय संघ –

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, केएस भरत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, उमेश यादव, जयदेव उनाडकट.