scorecardresearch

Premium

IND vs SA: “हा तर प्रत्येक सामन्यात म्हणतो…”; रवींद्र जडेजाच्या डीआरएस मागणीवर रोहित शर्माची मजेशीर प्रतिक्रिया

Rohit Sharma Reaction on DRS: भारताचा फिरकी गोलंदाज रवींद्र जडेजाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेत ९ षटकात ३३ धावा देऊन पाच बळी घेतले. त्याचबरोबर भारतीय संघाने विश्वचषकातील आपला सलग आठवा विजय मिळवला आणि गुणतालिकेतील आपले अव्वल स्थान अजून मजबूत केले.

Rohit Sharma said on Ravindra Jadeja's demand to take DRS
रोहित शर्माची रवींद्र जडेजाच्या डीआरएस मागणीवर प्रतिक्रिया

Rohit Sharma said on Ravindra Jadeja’s demand to take DRS: एकदिवसीय विश्वचषक २०२३ या स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघासाठी आतापर्यंत सर्व काही ठीक झाले आहे. मग ती गोलंदाजी असो, फलंदाजी असो किंवा क्षेत्ररक्षण असो. पण आणखी एक विभाग आहे ज्यामध्ये भारताचा रेकॉर्ड उत्कृष्ट राहिला आहे आणि तो म्हणजे डीआरएस. भारतीय कर्णधार रोहित शर्माने वर्ल्डकपमध्ये सातत्याने योग्य रिव्ह्यू घेतले आहेत. त्यामुळे टीम इंडियाला अनेक महत्त्वाच्या सामन्यांमध्ये मदत झाली आहे. रोहितच्या उत्कृष्ट डीआरएस रेकॉर्डमागील सर्वात मोठे कारण म्हणजे त्याचा खेळाडूंवरचा विश्वास.

श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यानंतर जेव्हा रोहितला रिव्ह्यू घेण्याच्या प्रक्रियेबद्दल विचारण्यात आले तेव्हा त्याने स्पष्टपणे सांगितले की, तो हा निर्णय गोलंदाज आणि यष्टीरक्षकावर सोडतो. तो म्हणाला, “मी हा निर्णय गोलंदाज आणि यष्टीरक्षकावर सोडला आहे आणि मला विश्वास ठेवू शकेल असे खेळाडू शोधायचे आहेत. मला माहित आहे की डीआरएसचा निर्णय कोणाच्याही पक्षात जाऊ शकतो. आज आम्हाला एक योग्य आणि एक चुकीचा रिव्ह्यू मिळाला.”

IND vs ENG 1st Test Match Updates in marathi
IND vs ENG : टीम इंडियाच्या फलंदाजांनी टॉम हार्टलीसमोर टेकले गुडघे, इंग्लंडचा भारतावर २८ धावांनी दणदणीत विजय
AUS vs WI 2nd Test Match Updates in marathi
AUS vs WI 2nd Test : वेस्ट इंडिजचा ऑस्ट्रेलियावर ८ धावांनी ऐतिहासिक विजय, शमर जोसेफ ठरला विजयाचा शिल्पकार
Rahul Dravid has says that KL Rahul will not take wicket keeping
IND vs ENG : राहुल द्रविडने घेतला मोठा निर्णय, केएल राहुलला ‘या’ जबाबदारीतून केले मुक्त
ICC has Announced the best Test team for 2023 and Pat Cummins captain
ICC Test Team : आयसीसीचा सर्वोत्तम कसोटी संघ जाहीर, विराट-रोहित नव्हे तर ‘या’ दोन भारतीय खेळाडूंना मिळाले स्थान

रविवारी भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या सामन्यातही असेच काहीसे पाहायला मिळाले. जेव्हा रवींद्र जडेजा आणि केएल राहुल यांच्या सांगण्यावरून, रोहितने डीआरएस घेतला जो शेवटी भारताच्या बाजूने गेला. ही घटना १३व्या षटकातील होती, जेव्हा लेग स्टंपचा चेंडू स्वीप करण्याच्या प्रयत्नात जडेजाच्या पाचव्या चेंडूवर हेनरिक क्लासेनला फटका मारताना चुकला. त्यावेळी रवींद्र जडेजा आणि इतर खेळाडूंनी एलबीडब्ल्यूची अपील केली. फील्ड अंपायर कुमार धर्मसेना यांनी गोलंदाजाचे अपील फेटाळले. त्यानंतर रोहितही फारसा इंटरेस्टिंग दिसत नव्हता पण जडेजा वारंवार डीआरएस घेण्यास सांगत होता.

हेही वाचा – IND vs SA: रवींद्र जडेजाने रचला इतिहास! विश्वचषकाच्या एका डावात ५ विकेट्स घेणारा ठरला दुसरा भारतीय फिरकीपटू

हा तर प्रत्येक सामन्यात म्हणतो आऊट आहे – रोहित शर्मा

त्यावेळी जडेजाची उत्सुकता पाहून रोहित गंमतीने म्हणाला, “हा तर प्रत्येक सामन्यात म्हणतो आऊट आहे.” पण यष्टिरक्षक राहुलशी थोडी चर्चा केल्यानंतर भारतीय कर्णधार म्हणाला, “तो एकटाच फलंदाज राहिला आहे, त्यामुळे चला घेऊया. त्यानंतर रिव्ह्यू घेतला गेला. त्यानंतर बॉल ट्रॅकिंगमध्ये असे दिसून आले की बॉल लाइनवर पिच होत होता आणि त्याचा इम्पॅक्ट देखील लाइनच्या आत होता. शेवटी बॉल लेग स्टंपला लागला. तीनही रेड लाइन मोठ्या पडद्यावर दिसू लागल्यानंतर क्लासेनला आऊट देण्यात आले.

हेही वाचा – विराटचा ‘शतकोत्सव’! सचिनच्या ४९ एकदिवसीय शतकांशी बरोबरी

कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर झालेल्या सामन्यात जडेजाने शानदार गोलंदाजी करत पाच विकेट्स घेत दक्षिण आफ्रिकेला ८३ धावांत गुंडाळले. यासह जडेजाने विश्वचषक स्पर्धेत पाच बळी घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांच्या यादीत आपले नाव समाविष्ट केले. टीम इंडियाने हा सामना २४३ धावांनी जिंकला आणि गुणतालिकेत आपले पहिले स्थान मजबूत केले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Rohit sharma said on ravindra jadejas demand to take drs this is called out in every match in ind vs sa updates vbm

First published on: 06-11-2023 at 13:50 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×