Rohit Sharma’s reaction to the captaincy of Team India: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेला ५ ऑक्टोबर २०२३ पासून सुरुवात होणार आहे. म्हणजेच या स्पर्धेला प्रारंभ होण्यास फक्त एक दिवस शिल्लक आहे. या स्पर्धेतील पहिला सामना गुरुवारीअहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गतविजेत्या इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला जाणार आहे. स्पर्धेतील भारताचा पहिला सामना ८ ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलिया विरुद्ध चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे. तत्पूर्वी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारताने शेवटची आयसीसी ट्रॉफी २०१३ मध्ये जिंकली होती. एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. एका दशकानंतर, कर्णधार रोहित शर्मा म्हणतो की गुरुवारपासून सुरू होणाऱ्या ५० षटकांच्या क्रिकेट कार्निव्हलमध्ये तो आपल्या संघाला दशकभराचे लक्ष्य प्रभावित होऊ देणार नाही.इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना रोहित शर्माने कर्णधारपद उशिरा मिळण्याबाबतही चर्चा केली. रोहितला विचारण्यात आले की, वयाच्या ३६ व्या वर्षी हा त्याचा कर्णधार आणि खेळाडू म्हणून शेवटचा विश्वचषक असेल का? त्याला योग्य वेळी कर्णधारपद मिळाले की उशीर झाला असे वाटते का? यावर पुढे रोहित शर्माने आपली प्रतिक्रिया दिली.

यावर उत्तर देताना रोहित शर्मा म्हणाला, “साहजिकच, जेव्हा तुम्ही २६-२७ वर्षांचे असता, तेव्हा तुम्हाला यासाठी तुमच्या शिखरावर राहायचे असते. परंतु आपल्याला जे हवे आहे ते आपण नेहमीच मिळवू शकत नाही. तुम्ही भारतीय कर्णधारपदाबद्दल बोलत आहात. भारतीय संघात इतरही महान खेळाडू राहिले आहेत. आणखी बरेच खेळाडू संघाचे कर्णधार होण्यास पात्र होते. मलाही माझी वेळ येण्याची वाट पहावी लागली आणि ते अगदी योग्य आहे. माझ्या आधी विराट होता, एमएस (धोनी)ही होता.”

हेही वाचा – Asian Games स्पर्धेतील ऐतिहासिक कामगिरीनंतर पंतप्रधान मोदींकडून भारतीय खेळाडूंचे कौतुक; म्हणाले, “संपूर्ण देशासाठी…”

तो कोणत्या तरी स्तरावर कर्णधार व्हायला हवा होता –

रोहित शर्मा पुढे म्हणाला, “तुम्ही ती नावे पहा जी मागे सुटली आहेत. गौतम गंभीर, वीरेंद्र सेहवाग… हे सर्व भारतीय क्रिकेटचे दिग्गज आहेत. युवराज सिंगलाही विसरता कामा नये. त्याने कधीही भारताचे कर्णधारपद भूषवले नाही. युवराज भारतासाठी मॅचविनर राहिला आहे. तो कोणत्या तरी स्तरावर कर्णधार व्हायला हवा होता, पण तो होऊ शकला नाही. हेच जीवन आहे.”

हेही वाचा – World Cup 2023: विराट कोहलीने वर्ल्डकप पूर्वी मित्र-मंडळीना केली विनंती; म्हणाला, “आम्ही विश्वचषकाकडे वाटचाल करतोय पण…”

टीम इंडियाचा कर्णधार पुढे म्हणाला, “मला आता ते (कर्णधारपद) मिळाले आहे आणि मी त्यासाठी आभारी आहे. मला हे तेव्हाच आवडेल, जेव्हा मला कोणत्याही संघाचे नेतृत्व कसे करायचे माहित असते आणि इतर काय आवश्यक आहे. जेव्हा मला कर्णधारपदाची एबीसीडी माहित नसते तेव्हा मला आवडणार नाही. त्यामुळे त्या दृष्टीने हे चांगले आहे.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rohit sharma said that yuvraj singh remained the match winner for india so at what level he would have been a captain vbm
First published on: 04-10-2023 at 15:52 IST