Rohit Sharma Shouts At Fan Driving Fast Viral Video: भारताचा माजी कर्णधार रोहित शर्मा सध्या वेस्ट इंडिजविरूद्ध एकदिवसीय मालिकेसाठी तयारी करत आहे. यादरम्यान रोहित शर्मा अनेकदा चाहत्यांची भेट घेतानाही दिसला आहे. दरम्यान रोहित शर्माचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये रोहित पार्किंगमध्ये उभा असून एका चाहत्याला ओरडताना दिसत आहे. रोहितचा हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
माजी भारतीय कर्णधार रोहित शर्माचा एक मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका चाहत्याला ऑटोग्राफ देण्यासाठी थांबण्यापूर्वी रोहित शर्मा कोणालातरी ओरडताना दिसला. यादरम्यान रोहित शर्मासमोर बॅट घेऊन एक चाहता उभा होता आणि रोहितचा बॉडीगार्डही तिथेच होता. रोहितचा हा मजेशीर व्हिडीओ चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे.
या व्हिडीओमध्ये रोहित त्या व्यक्तीला “किती फास्ट गाडी चालवतो यार तू”, असं म्हणताना ऐकू येतं. म्हणजेच, संबंधित व्यक्ती गाडी खूप वेगाने चालवत असल्याचं रोहितने मजेशीरपणे म्हटल्याचं दिसत आहे. पार्किंगमध्ये रोहित शर्मा उभा असलेला दिसत असल्याने कदाचित रोहित नुकताच कारने प्रवास करून आल्याच आणि संबंधित कार त्याला पाहण्यासाठी शेजारून भरधाव धावत असल्याचा अंदाज असू शकतो.
या संवादाचा नेमका संदर्भ स्पष्ट झालेला नाही. मात्र, रोहितचा अंदाज पाहता संबंधित व्यक्तीच्या ड्रायव्हिंगच्या वेगावर त्याने टिप्पणी केल्याचं जाणवतं. त्यानंतर रोहितने चाहत्याकडे लक्ष दिलं आणि त्याला ऑटोग्राफ दिला. ज्या चाहत्याला रोहितने ऑटोग्राफ दिला, त्याच्यासाठी हा अनुभव आणखी खास ठरला. रोहित शर्माकडून त्याने बॅटवर आधी ऑटोग्राफ घेतला आणि त्यानंतर त्याने टीशर्टवरही रोहितचा ऑटोग्राफ घेतला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. रोहितचा नेहमीचा सहज, मोकळा आणि मिश्कील अंदाज चाहत्यांना चांगलाच भावला आहे.
रोहित शर्मा २०२७ चा वनडे वर्ल्डकप खेळणार की नाही यावर सध्या चर्चांना उधाण आलं आहे. नुकत्याच झालेल्या इंग्लंड मालिकेतील लॉर्ड्सवरील वनडे सामना रोहितचा अखेरचा सामना असणार अशी चर्चा रंगली होती. पण बीसीसीआयने ही बातमी खोटी असल्याचं म्हटलं आणि त्यानंतर हिटमॅनने लॉर्ड्सच्या मैदानावर शतक झळकावत सर्वांची बोलती बंद केली होती. यासह आता रोहित पुढील मालिकांमध्ये कशी कामगिरी करणार, यावर तो २०२७ च्या वनडे वर्ल्डकपमध्ये खेळणार की नाही याचा निर्णय घेतला जाईल.
