Rohit Sharma Dance With Shreyas Iyer And Shardul Thakur: क्रिकेटचं मैदान गाजवल्यानंतर आता हिटमॅन रोहित शर्माने आपल्या आयुष्यातील दुसऱ्या इनिंगला सुरूवात केली आहे. रोहित शर्मा आता मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. ज्या दिवशी त्याने आपल्या टी-२० कारकिर्दीला सुरूवात केली, त्याच दिवशी त्याचा नवीन शो प्रदर्शित होणार आहे. १९ सप्टेंरबरला रोहितचा नवीन शो, फॅमिली फुल हाऊस विद रोहित शर्मा प्रदर्शित होणार आहे. या शो च्या प्रोमोची जोरदार चर्चा रंगली आहे. दरम्यान या शो च्या प्रोमोमधील एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो श्रेयस अय्यर आणि शार्दुल ठाकूरसोबत डान्स करताना दिसून येत आहे.

काही वर्षांपूर्वी रोहित शर्मा, श्रेयस अय्यर आणि शार्दुल ठाकूर या तिघांचा हॉटेल रूममधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये तिन्ही खेळाडू ‘सेहरी बाबू’ या गाण्यावर मजेशीर डान्स करताना दिसून आले होते. फॅमिली फुल हाऊस विद रोहित शर्माच्या पहिल्या एपिसोडमध्ये शादुल ठाकूर, श्रेयस अय्यर आणि अभिषेक नायर या स्टार खेळाडूंनी हजेरी लावली होती. यादरम्यान चौघांनी मिळून सेहरी बाबू गाण्यावर डान्स केला. शेवटी रोहित स्टेप्स विसरला आणि म्हणाला, “अरे सर्वच विसरले..” हा मजेशीर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

मैदानावर गोलंदाजांची धुलाई करणारा रोहित शर्मा आता कॉमेडी शो मध्ये मस्ती करताना दिसून येणार आहे. रोहित टीव्ही शो मध्ये झळकणार ही बातमी व्हायरल होताच सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली आहे, ती म्हणजे हिटमॅनचा शो सुपरहिट होणार. रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळताना भारतीय संघाने २०२३ वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील अंतिम फेरीत प्रवेश केला होता. त्यानंतर २०२४ मध्ये झालेल्या टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत जेतेपदाचा मान पटकावला. तसेच २०२५ मध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये जेतेपदाचा मान पटकावला. येत्या काही दिवसात तो वेस्ट इंडिजविरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेत खेळताना दिसून येणार आहे.

vरोहित शर्मा हा आपल्या तुफान फटकेबाजीसह मजेशीर स्वभावासाठीही ओळखला जातो. त्याचे अनेक मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ज्यामध्ये तो खेळाडूंसोबत मस्करी करताना दिसून आला आहे. आता रिअॅलिटी शो मध्ये त्याची मस्ती पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. क्रिकेटचं मैदान गाजवणारा हिटमॅन रिअॅलिटी शो च्या मैदानावर किती मोठी इनिंग खेळणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.