‘लॉकडाउन’मध्ये समायराला मिळाले नवे मित्र; रोहितने शेअर केला फोटो

पाहा गोंडस समायराची खास दोस्तमंडळी

करोना विषाणूचा प्रादुर्भाव सध्या देशासह जगभरात झपाट्याने होत आहे. करोनामुळे अनेक देश संक्रमित झाले आहेत. आपल्या देशातील नागरिकांना वाचवण्यासाठी देश आपापल्या स्तरावर उपाययोजना करत आहेत. करोना हा साथीचा रोग असल्याने बहुतांश देशांनी या रोगाचा फैलाव रोखण्यासाठी लॉकडाउनचा पर्याय स्वीकारला आहे. त्यामुळे साऱ्यांना घरातच राहण्याची सक्ती करण्यात आली आहे. काही लोक आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहेत, तर काही लोक सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह आहेत.

VIDEO : झटक्यात झाले एकाचे पाच चेहरे… पाहा फिंचचं मजेदार रूप

भारताचा क्रिकेटपटू रोहित शर्मा हा त्याच्या चाहत्यांशी लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधून आपला वेळ घालवतो, पण त्याची छोटीशी मुलगी समायरा मात्र घरी एकटीच आहे. तिच्याशी खेळायला घरात कोणीच मित्रमंडळी नाहीत. पण रोहितने मात्र तिचा वेळ चांगलं जावा यासाठी तिला झकास मित्र गाठून दिले आहेत. रोहितने बेबी समायराचा एक फोटो शेअर केला आहे. त्या फोटोमध्ये तिच्या आजूबाजूला खेळण्याचा खच पडला आहे. त्याच फोटोला रोहितने कॅप्शन दिले आहे की समायरा कंटाळलेली नाही कारण तिच्यासोबत तिची मित्रमंडळी आहेत.

 

आफ्रिदीने निवडला ‘वर्ल्ड कप स्पेशल’ संघ; सचिनऐवजी ‘या’ भारतीयाला स्थान

रोहितने डिसेंबर २०१५ मध्ये त्याची मॅनेजर असलेल्या रितिकाशी लग्न केलं. रोहितची पत्नी होण्याआधी रितिका त्याची मॅनेजर म्हणून काम पाहत होती. याच वेळी रोहित शर्माचा रितिकावर जीव जडला आणि त्याने तिला लग्नाची मागणी घालायचं ठरवलं. रोहितने रितिकाला लग्नाची मागणी एकदम फिल्मी स्टाइलने घातली होती. रोहित शर्मा आपल्या वाढदिवसाच्या दोन दिवस आधी २८ एप्रिलला रितिकाला घेऊन मुंबईतल्या बोरिवलीमधील एका स्पोर्ट्स क्लबमध्ये गेला होता. तिथे काही वेळ सोबत घालवल्यानंतर रोहित शर्माने रितिकाला एक सरप्राइज दिलं. अजिबात कल्पना नसल्याने रितिकासाठी हा खूप मोठा आश्चर्याचा धक्का होता. रोहित शर्माने त्यावेळी रितीकाला लग्नाची मागणी घातली होती. रोहितने तिथेच क्लबमध्ये रितिकाला अंगठी घालून आपल्या प्रेमाची कबुली दिली. त्यानंतर रोहित-रितिकाने जून २०१५ मध्ये साखरपुडा, तर डिसेंबर २०१५ मध्ये विवाह केला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Rohit sharma shares cute photo of daughter samaira with her new friends toys on instagram story vjb

Next Story
विजयी भव !
ताज्या बातम्या