भारतीय कर्णधार रोहित शर्माने टी-२० विश्वचषकापूर्वी एका विदेशी यूट्यूब चॅनलला मुलाखत दिली आहे. दुबई आय 103.8 या यूट्यूब चॅनलवरील २१ मिनिट ३४ सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये रोहितने मनमोकळेपणाने गप्पा मारत प्रश्नांची उत्तरे दिली. या थेट प्रक्षेपणामध्ये , ३७ वर्षीय रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द, भारतीय क्रिकेटचे कर्णधारपद यासारख्या विषयांवर चर्चा केली. दरम्यान रोहितने त्या गोलंदाजाचा खुलासा केला आहे, ज्याच्याविरुद्ध खेळण्यापूर्वी तो १०० वेळा व्हिडिओ पाहत असे. हा गोलंदाज कोण आहे ते जाणून घेऊया.

दुबई आय 103.8 यूट्यूब चॅनलवर बोलताना रोहित शर्मा म्हणाला, “ज्या गोलंदाजाचा व्हिडिओ मी सामन्यापूर्वी १०० वेळा पाहिला आहे तो म्हणजे डेल स्टेन. तो एक दिग्गज गोलंदाज आहे आणि त्याने जे काही साध्य केलंय ते आश्चर्यकारक आहे. मी त्याच्याविरूद्ध अनेकदा फलंदाजी केली आहे. तो वेगवान गोलंदाजी करतो, तो वेगवान चेंडूला कमालीचा स्विंग करतो, ज्याच्यासमोर खेळणं सोपं नाहीय. असे नाही की मला त्याच्याविरुद्ध खूप यश मिळाले आहे, पण स्टेनविरूद्ध फलंदाजी करणं एक चांगला अनुभव होता.”

What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
Video Neeta Ambani Requesting Chats With Rohit Sharma
नीता अंबानी रोहित शर्माला काय म्हणाल्या? मुंबईच्या दहाव्या पराभवानंतर ‘ते’ संभाषण कॅमेऱ्यात कैद, Video पाहा
Sachin Tendulkar Son Arjun Tendulkar Aggression
२ चेंडूंवर, २ षटकार व सचिन तेंडुलकरच्या लेकाची माघार; अर्जुनला खुन्नस देणं पडलं महाग, MI vs LSG ची नाट्यमय ओव्हर पाहा
narendra modi shinde fadnavis reuters
फडणवीसांना डावलून शिंदेंना मुख्यमंत्री का केलं? पंतप्रधान मोदींनी सांगितली भाजपाची रणनीती
Hardik Pandya Shouted on Jasprit Bumrah Video
IPL 2024: हार्दिक पंड्या भर मैदानात बुमराहवर ओरडला, निराश झालेल्या जसप्रीतने दिली अशी प्रतिक्रिया; Video व्हायरल
Michael Clark Statement on Hardik Pandya Selection in Team India and Hails Captain Rohit Sharma
“…तर रोहितने टी-२० वर्ल्डकप संघात पंड्याची निवड होऊच दिली नसती”, माजी खेळाडूचे मोठे वक्तव्य
pm modi on prajwal revanna sex tape row
प्रज्वल रेवण्णा प्रकरणावर पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच केलं भाष्य; म्हणाले…
Rohit Surya Tilak Varma Leaves as Hardik pandya Comes to bat As Per Reports
IPL 2024: हार्दिकला येताना पाहताच रोहित-सूर्या-तिलक उठून गेले? मुंबई इंडियन्स संघातील वाद पुन्हा चव्हाट्यावर

हेही वाचा- IPL 2024: हार्दिकला येताना पाहताच रोहित-सूर्या-तिलक उठून गेले? मुंबई इंडियन्स संघातील वाद पुन्हा चव्हाट्यावर

याशिवाय आपल्या क्रिकेट कारकिर्दीबद्दल बोलताना रोहित म्हणाला, “भारतासाठी खेळतानाचा हा १७ वर्षांचा प्रवास चांगला राहिला आहे आणि आशा आहे की मी अजून काही वर्षे खेळेन आणि जागतिक क्रिकेटवर प्रभाव पाडू शकेन.” रोहित शर्मा हा भारताच्या आजवरच्या सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. २००७ मध्ये पदार्पण केल्यापासून, त्याने वर्षानुवर्षे स्वत: मध्ये सुधारणा करून खूप मोठा पल्ला गाठला आहे. मोठे षटकार मारण्याची आणि मोठा डाव खेळण्याची त्याची क्षमता त्याला एक अद्वितीय फलंदाज बनवते.

विराट कोहलीचा उत्तराधिकारी बनणे हे आव्हानात्मक काम होते का, या प्रश्नाच्या उत्तरात रोहित शर्मा म्हणतो, “भारताचे कर्णधारपद भूषवणे माझ्यासाठी अभिमानाची आणि सन्मानाची बाब आहे. इथपर्यंत पोहोचून एक दिवस संघाचे नेतृत्व करेन, असे मला कधीच वाटले नव्हते. चांगल्या लोकांच्या बाबतीत चांगल्या गोष्टी घडतात, असं म्हणतात. जेव्हा मी संघाचे कर्णधारपद स्वीकारले तेव्हा मला एकाच दिशेने पुढे जायचे होते. सांघिक खेळ असाच खेळला पाहिजे. याचा वैयक्तिक टप्पे, वैयक्तिक रेकॉर्डशी काहीही संबंध नाही. ११ खेळाडूंनी एकत्र खेळून ट्रॉफी जिंकावी हे लक्ष्य असायला हवे.”

हेही वाचा- IPL 2024: १८ धावा किंवा १८.१ षटके… आरसीबी की चेन्नई कोण गाठणार प्लेऑफ, वाचा कसं आहे समीकरण?

आगामी टी-२० विश्वचषकासाठी रोहित शर्माच्या खांद्यावर संघाची जबाबदारी आहे. आयपीएलनंतर आता सर्वांच्या नजरा वेस्ट इंडिज अमेरिकेत होणाऱ्या वर्ल्डकपवर असणार आहेत.