Rohit Sharma Viral Video: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माचा चाहता वर्ग मोठा आहे. रोहितची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुर असतात. रोहित शर्माची फलंदाजी असो वा त्याची मुंबईची स्लँग भाषा चाहत्यांना मात्र भुरळ घालणारी असते. त्यात रोहित मुळचा मुंबईचा आहे आणि हा मुंबईचा लाडका क्रिकेटपटू आपल्या कारमधून मुंबईच्या रस्त्यांवरून जाताना दिसला. यादरम्यान त्याने ट्रॅफिकमध्ये कार थांबवली होती, त्याचा व्हीडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

रोहित शर्माने पुन्हा जिंकलं मन

मुंबईच्या रस्त्यावर लॅम्बोर्गिनीमधून जात असलेल्या रोहित शर्माने रस्ता मोकळा असतानाही आपली कार थांबवली आणि कारची काचही खाली करत चाहत्यांची भेट घेतली. यादरम्यान रोहित शर्माबरोबर फोटो काढण्यासाठी एक चाहती पुढे आली. तिथे असलेल्या अन्य लोकांनी तिचा वाढदिवस असल्याचे सांगितले आणि हे ऐकताच रोहितने त्या चाहतीला हात मिळवत वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत. त्या चाहतीच्या चेहऱ्यावरील आनंद गगनात मावेनासा झाला होता. त्यानंतर तिने फोटो काढला आणि रोहितही कारमधून पुढे गेला. ट्रॅफिक होऊ नये हे पाहता अवघे काही मिनिट रोहित थांबला आणि लगेच निघाला.

हेही वाचा – PAK vs ENG Test: थांबायचं नाय गड्या! जो रूटचे झंझावाती ३५वे कसोटी शतक, ॲलिस्टर कुकला मागे टाकत ठरला इंग्लंडचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू

रोहित शर्माने १६ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी सराव सुरू केला आहे. भारताचा कर्णधार मुंबईतील प्रशिक्षण केंद्रात सराव करताना दिसला. बीसीसीआयची वरिष्ठ निवड समिती या आठवड्यात न्यूझीलंडविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी संघ जाहीर करण्याची शक्यता आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. दुसरा कसोटी सामना पुण्यात तर मालिकेचा अंतिम सामना मुंबईत खेळवला जाईल.

हेही वाचा – Rohit Sharma : रोहित शर्मा २०२७ चा एकदिवसीय विश्वचषक खेळणार की नाही? बालपणीचे कोच दिनेश लाड यांनी दिले उत्तर

टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर टी-२० क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या रोहित शर्माने बांगलादेश कसोटी मालिकेनंतर विश्रांती घेतली होती. रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने गेल्या महिन्यात बांगलादेशविरूद्धची कसोटी मालिका २-० ने जिंकली होती. बांगलादेशविरुद्धच्या टी-२० मालिकेचा तो भाग नसून, रोहितने मुंबईला परतण्यापूर्वी दुबईमध्ये आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवला.

रोहित शर्माचा फिटनेस आणि फॉर्म भारताच्या आगामी कसोटी मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण ठरणार आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेनंतर भारत ३१ वर्षांत पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. ज्यामध्ये पिंक बॉल टेस्टही खेळवली जाणार आहे.