Indian Cricketers Mourns on Ratan Tata Death: भारतीय संघाचा कसोटी आणि वनडे कर्णधार रोहित शर्मा आणि टी-२० संघाचा कर्णधार रोहित शर्माने उद्योगपती रतन टाटा यांना भावुक पोस्ट करत आदरांजली वाहिली आहे. भारतीय उद्योग जगतातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आणि टाटा समूहाचे चेयरमन रतन नवल टाटा यांचे बुधवारी रात्री वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दीर्घ आजारावर उपचार घेत होते. रतन टाटा यांच्या निधनाची बातमी बुधवारी रात्री उशिरा कळवण्यात आली.

श्री रतन टाटा यांच्या निधनाने राजकारण आणि मनोरंजन क्षेत्रातील विविध व्यक्तिमत्त्वांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. आता, रोहित शर्मानेही रतन टाटा यांना भावुक होत आदरांजली वाहिली आहे. रोहित शर्माने या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “खूप मोठ्या मनाचा माणूस. सर तुम्ही कायमच स्मरणार राहाल… एक असा माणूस ज्याने नेहमीच इतरांची काळजी घेतली आणि सगळ्यांचं चांगलं व्हावं यासाठी आयुष्यभर जगले.”‘खूप मोठ्या मनाचा माणूस. सर तुम्ही कायमच स्मरणार राहाल… एक असा माणूस ज्याने नेहमीच इतरांची काळजी घेतली आणि सगळ्यांचं चांगलं व्हावं यासाठी आयुष्यभर जगले.”

brothers beaten up, Dombivli Kachore,
डोंबिवली कचोरे येथे पेटलेला सुतळी बॉम्ब अंगावर फेकण्याच्या वादातून दोन भावांना मारहाण
Todays Horoscope 9 November In Marathi
९ नोव्हेंबर पंचांग: कष्टाचे फळ, कुटुंबात गोडवा ते…
After threat to UP CM Yogi Adityanath Mumbai Police received another threat message
योगींचा मृत्यू बाबा सिद्दीकीसारखा झाला, तर भारताची अवस्था हमास, इस्त्राईलसारखी आणखी एक धमकीचा संदेश
Rishi Kapoor would have killed himself
…तर ऋषी कपूर यांनी आत्महत्या केली असती, नीतू कपूर यांनी लेक रिद्धिमाबद्दल बोलताना केलेलं वक्तव्य
Loksatta anvyarth Ten elephants died in the Bandhavgarh tiger project in Madhya Pradesh
अन्वयार्थ: हत्तीएवढ्या दुर्लक्षाचे बळी
Pune hit and run case
पुण्यात पुन्हा हिट अँड रन! रस्त्यावर फटाके फोडणाऱ्याला भरधाव कारने दिली धडक; ३५ वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू
nawab malik son in law sameer khan passed away
नवाब मलिक यांच्या जावयाचे निधन; काही दिवसांपूर्वी झाला होता गंभीर अपघात, निवडणूक काळात कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर
Praful Patel criticized Raj Thackeray for his statement
अजून मूल जन्माला आलं नाही, त्याआधीच त्याचं साक्षगंध, लग्न…, खा. प्रफुल्ल पटेल यांचा ‘यांना’ टोला

हेही वाचा – Ratan Tata Death: “भारताने खरं रत्न गमावलं…”, सेहवागने रतन टाटा यांना आदरांजली वाहत शेअर केली भावुक पोस्ट

“तुमचं जीवन भारतासाठी वरदान ठरलं…”, रतन टाटांसाठी सूर्यकुमार यादवची भावुक पोस्ट

रोहित शर्माबरोबरच भारतीय टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवनेही एक्सवर रतन टाटा यांच्या फोटोसह एक पोस्ट शेअर केली, ज्यात तो म्हणाला, “एका युगाचा अंत. दयाळू, सर्वात प्रेरणादायी आणि विलक्षण असं व्यक्तिमत्त्व. सर तुम्ही अनेकांसाठी प्रेरणास्थान आहात. तुमचं संपूर्ण जीवन हे देशासाठी एक मोठं वरदान ठरलं. देशासाठी तुम्ही दिलेल्या योगदानाप्रति आम्ही सगळे ऋणी आहोत. तुमचा वारसा कायमच पुढे असाच राहील.”

हेही वाचा – IND W vs SL W: भारताने वर्ल्डकपमध्ये घेतला आशिया कपचा बदला, गुणतालिकेत न्यूझीलंडला मागे टाकत उपांत्य फेरीच्या दिशेने मोठे पाऊल

पद्मविभूषण रत टाटा यांच्यावर शासकीय इतमामात वरळी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. तर महाराष्ट्र सरकारने एक दिवसाचा राजकीय दुखवटा जाहीर केला आहे. रतन टाटा यांच्या निधनाने संपूर्ण देशभरात हळहळ व्यक्त केली जात आहे. टाटा यांचं भारतीय उद्योग क्षेत्रातील योगदान हे शब्दात व्यक्त न करता येण्यासारखं आहे. भारतीय क्रिकेटमधील अनेक आजी माजी क्रिकेटपटूंनी रतन टाटा यांना आदरांजली वाहिली आहे.

हेही वाचा – VIDEO: मार्नस लबूशेनने उभा केला पंचांच्या मागे क्षेत्ररक्षक; व्हीडिओ पाहून तुम्ही चक्रावून जाल