Premium

IND vs SL: हिटमॅनने डायव्हिंग करत एका हाताने घेतला शानदार झेल, रोहितच्या शर्माच्या कॅचचा VIDEO सोशल मीडियावर व्हायरल

Rohit Sharma Catch Video : भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामन्यात रोहित शर्माने दासून शनाकाचा शानदार झेल घेतला. ज्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

IND vs SL Rohit Sharma Catch Video Vira;
रोहित शर्मा (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Rohit Sharma taking a brilliant catch Dasun Shanaka: आशिया चषकाच्या सुपर फोर फेरीत भारतीय संघाने आपल्या दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेचा ४१ धावांनी पराभव केला. यासह टीम इंडियाने अंतिम फेरी गाठली आहे. आता भारताचा सामना श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यातील विजेत्याशी होणार आहे. मात्र, याआधी टीम इंडियाला बांगलादेशविरुद्ध सामना खेळायचा आहे. दरम्यान या सामन्यात रोहित शर्माने दासून शनाका अप्रतिम झेल घेतल्या व्हिडीओ व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२०व्या षटकांतील दुसऱ्या चेंडूवर ९९ धावांच्या धावसंख्येवर श्रीलंकेची सहावी विकेट पडली. दासून शनाका १३ चेंडूत नऊ धावा करून बाद झाला. रवींद्र जडेजाने त्याला रोहित शर्माकरवी झेलबाद केले. स्लिपमध्ये उभे असलेल्या रोहित शर्माने उजव्या बाजूला डायव्हिंग करत शानदार झेल घेतला. ज्याचा व्हिडीओ आता तुफान व्हायरल होत आहे.

भारताने श्रीलंकेचा ४१ धावांनी पराभव केला आहे. यासह टीम इंडियाने आशिया कप २०२३ च्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. प्रथम फलंदाजी करताना भारताने ४९.१ षटकात २१३ धावा केल्या होतया. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ ४१.३ षटकांत १७२ धावांवर गारद झाला. भारताकडून कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक ५३ धावा केल्या. राहुलने ३९ आणि किशनने ३३ धावांचे योगदान दिले. श्रीलंकेकडून दुनिथ वेल्लालगेने पाच विकेट घेतल्या, तर चरित असलंकाने चार विकेट घेतल्या. शेवटची विकेट महिष तिक्षीनाच्या नावावर राहीली. भारताच्या सर्व १० विकेट्स फिरकी गोलंदाजांनी घेतल्या.

श्रीलंकेकडून दुनिथ वेलालगेने पाच आणि चरिथ असलंकाने चार विकेट घेतल्या. श्रीलंकेच्या डावात दुनिथ वेल्लालगेने सर्वाधिक ४२* धावा केल्या. धनंजय डी सिल्वाने ४१ धावांचे योगदान दिले. भारताकडून कुलदीप यादवने चार विकेट घेतल्या. जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजाने प्रत्येकी दोन बळी घेतले.

पॉइंट टेबलवर एक नजर –

आता जर आपण आशिया चषक २०२३च्या सुपर फोरच्या पॉइंट्स टेबलवर नजर टाकली तर टीम इंडियाने दोन सामन्यांत दोन विजय मिळवून चार गुण मिळवले आहेत. त्याचा नेट रनरेट देखील उत्कृष्ट २.६९० आहे. तर श्रीलंका आणि पाकिस्तान प्रत्येकी एक विजय आणि पराभवानंतर २ गुणांसह अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत. श्रीलंकेचा निव्वळ धावगती -०.२ आहे. त्याचबरोबर पाकिस्तानचा नेट रन रेट खूपच खराब आहे -१.८९२. बांगलादेशचा संघ सुपर फोरमधील दोन्ही सामने गमावल्यानंतर आता स्पर्धेतून बाहेर पडला आहे. टीम इंडिया आता शेवटचा सुपर 4 सामना बांगलादेशविरुद्ध 15 सप्टेंबरला खेळणार आहे. या सामन्यात रोहित शर्मा आपली बेंच स्ट्रेंथ आजमावू शकतो.

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Rohit sharma taking a brilliant catch in the slips of sri lankan captain dasun shanaka video has gone viral vbm

First published on: 12-09-2023 at 22:42 IST
Next Story
Sunil Gavaskar: आशिया चषकातील टीम इंडियाच्या कामगिरीवर गावसकरांनी केले मोठे विधान; म्हणाले, “पाकिस्तानच्या गोलंदाजांची…”