भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंतच्या कारला भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये ऋषभ पंतला गंभीर दुखापत झाली आहे. दिल्लीहून घरी येत असताना भरधाव वेगात असणाऱ्या पंतच्या या स्पोर्ट्स कारला हा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. तो लवकर बरा व्हावा यासाठी त्याचे चाहते प्रार्थना करत आहे. ऋषभ पंतच्या गाडीला अपघात झाल्यानंतर त्याचे अनेक फोटो समोर आले आहेत. त्यावरुन आता भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्माची पत्नी पत्नी रितिका सजदेवने संताप व्यक्त केला आहे.

भारतीय क्रिकेट संघातील धडाकेबाज खेळाडू अशी ओळख असलेल्या ऋषभ पंतच्या कारला आज सकाळच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. हरिद्वार जिल्ह्यामध्ये रूरकीच्या नारसन सीमेवर हम्मदपुर झाल जवळील एका वळणावर ऋषभच्या कारचा अपघात झाला. यात तो गंभीर जखमी झाला आहे. दिल्लीहून ऋषभ घरी येत असताना त्याच्या कारला हा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. यानंतर त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
आणखी वाचा : ऋषभ पंतच्या कारला भीषण अपघात झाल्यानंतर उर्वशी रौतेलाची पोस्ट, म्हणाली…

salman khan firing accused Sagar pal father reaction
सलमान खानच्या घरावर गोळ्या झाडणाऱ्या आरोपीच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “तो खूप…”
Ram Navami 2024: Mughal version of Ramayana
Ram Navami 2024: ‘या’ मुघल सम्राटाच्या आईला प्रिय होते रामायण? कोण होता हा सम्राट?
lokmanas
लोकमानस: नेतान्याहूंची अखेरची धडपड
youth dies
मस्करी जीवावर बेतली; कम्प्रेसरच्या सहाय्याने मित्राच्या गुदद्वारात हवा भरली, तरूणाचा दुर्दैवी मृत्यू

यातील अनेक फोटोत ऋषभ पंतच्या डोक्याला मार लागल्याचे दिसले आहेत. तर काही फोटोत त्याच्या पाठीला गंभीर जखमा झाल्या आहेत. ऋषभच्या कारच्या अपघाताचा व्हिडीओही समोर आला आहे. या सर्व प्रकरणी रोहित शर्माची पत्नी पत्नी रितिका सजदेवने नेटकऱ्यांसह प्रसारमाध्यमांवर टीका केली आहे.

रितिका सजदेवने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे. “एखाद्या जखमी असलेल्या किंवा इजा झालेल्या व्यक्तीचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करताना तुम्हाला लाज वाटली पाहिजे. असे फोटो किंवा व्हिडीओ शेअर करायचे की नाही याबद्दलही तुम्ही विचार करायला हवा. यामुळे त्याचे कुटुंबीय आणि मित्र यांच्यावर मोठा परिणाम झाला आहे. एकीकडे पत्रकारिता आहे आणि दुसरीकडे फक्त असंवेदनशीलता”, असे रितिकाने म्हटले आहे.

नेमका कोठे घडला अपघात?

दरम्यान, ऋषभ पंत हा दिल्लीहून उत्तराखंडच्या रुरकीला जात होता. यावेळी पहाटे गुरुकुल नरसन परिसरात हा अपघात झाला. अपघातानंतर स्थानिकांनी तत्काळ १०८ ला फोन करत ऋषभला रुग्णालयात दाखल केले. अपघातावेळी कारमध्ये ऋषभ पंत एकटाच होता.

डॉ. सुशील नागर यांनी ऋषभ पंतच्या प्रकृतीविषयी अधिक माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार पंतच्या चेहऱ्यावर दोन ठिकाणी जखमा झाल्या आहेत. त्याच्या हाडांना कोणतीही इजा झालेली नाही. मात्र गुडघ्यांचे लिगामेंट्स आणि पाठीला दुखापत झालेली आहे. रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेव्हा ऋषभ पंत शुद्धीवर होता, असे नागर यांनी सांगितले. ऋषभ पंतवर मॅक्स रुग्णालयात पुढील उपचार सुरू आहेत.