IND vs AUS ODI Series Updates: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धची चार कसोटी सामन्यांची मालिका २-१ अशी जिंकली. कसोटीनंतर शुक्रवारपासून (१७ मार्च) सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ भिडणार आहेत. नियमित कर्णधार रोहित पहिल्या वनडेत खेळणार नाही. पहिला सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. रोहित शर्मा पहिला वनडे का खेळणार नाही, याबाबत माहिती समोर आली आहे.

बीसीसीआयने या मालिकेसाठी संघाची घोषणा केली, तेव्हा कौटुंबिक कारणांमुळे रोहित मुंबई वनडेसाठी उपलब्ध होणार नसल्याचे सांगण्यात आले. मात्र, आता या सामन्यात रोहित मैदान का उतरणार नाही, हे उघड झाले आहे. वास्तविक, पत्नी रितिका सजदेहचा भाऊ कुणाल सजदेहच्या लग्नाला उपस्थित राहणार आहे. त्यामुळे रोहितने पहिल्या वनडेत न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. कुणाल मेकअप आर्टिस्ट अनिशा शाहसोबत लग्न करत आहे. याबाबतचा खुलासा रितिका सजदेहने आपल्या भावाच्या हळदी समारंभाचे फोटो शेअर केल्याने झाला.

IPL 2024 Punjab Kings vs Mumbai Indians Match Updates in Marathi
IPL 2024: आयपीएलचे सर्व सीझन खेळलेल्या रोहित शर्माने रचला इतिहास, पंजाबविरूद्धचा सामना सुरू होताच हिटमॅनच्या नावे मोठी कामगिरी
Despite the efforts of PR Sreejesh the Indian hockey team lost
श्रीजेशच्या प्रयत्नांनंतरही भारतीय हॉकी संघाचा पराभव
Gautam Gambhir Praises MS Dhoni
IPL 2024 CSK vs KKR : चेन्नईविरुद्धच्या सामन्यापूर्वी गंभीरचं मोठं वक्तव्य; म्हणाला, “धोनी हा एक कुशल…”
Virat Kohli and Gautam Gambhir hugging each other
RCB vs KKR : विराट-गौतमने जिंकली सर्वांची मनं, गतवर्षातील वाद विसरुन एकमेकांची घेतली गळाभेट, VIDEO व्हायरल

हार्दिक पांड्या संघाची कमान सांभाळेल –

रोहितच्या अनुपस्थितीत, स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात जबाबदारी सांभाळेल. हार्दिक प्रथमच वनडे संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. याआधी त्याने आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये कर्णधारपद भूषवले आहे. १९ मार्च रोजी विशाखापट्टणम येथे होणाऱ्या दुसऱ्या वनडेसाठी रोहित भारतीय संघात सामील होईल. या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना २२ मार्च रोजी चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे.

हेही वाचा – Ricky Ponting: कांगारू गोलंदाजांना घाम फोडणाऱ्या ‘या’ भारतीय खेळाडूबद्दल पाँटिंगचा मोठा खुलासा; म्हणाला, त्याला आयपीएलचा फायदा झाला

भारत-ऑस्ट्रेलिया वनडे संघ –

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, रवींद्र जडेजा, विराट कोहली, कुलदीप यादव, सूर्यकुमार यादव, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, केएल राहुल, शुभमन गिल, शार्दुल ठाकूर, उमरान मलिक आणि जयदेव उनाडकट.

हेही वाचा – ICC Test Rankings: ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक झळकावत विराटने क्रमवारीत घेतली मोठी झेप, तब्बल ‘इतक्या’ स्थानांचा झाला फायदा

ऑस्ट्रेलिया: स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), मार्कस स्टॉइनिस, डेव्हिड वॉर्नर, ग्लेन मॅक्सवेल, अॅलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, मार्नस लॅबुशेन, मिचेल मार्श, नॅथन एलिस, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, शॉन अॅबॉट, अॅश्टन अॅगर आणि अॅडम झाम्पा.