scorecardresearch

WPL 2023 Final MI vs DC: रोहित शर्मासह ‘या’ खेळाडूंनी मुंबई इंडियन्सच्या महिला संघाला फायनलसाठी दिल्या खास शुभेच्छा, पाहा VIDEO

Rohit Sharma on WPL 2023 Final:’हिटमॅन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने मुंबई इंडियन्ससाठी एक खास संदेश शेअर केला आहे. महिला प्रीमियर लीगच्या अंतिम फेरीत मुंबईचा सामना दिल्ली कॅपिटल्सशी होणार आहे.

Rohit Sharma Wishes Mumbai Indians Women Players
रोहित शर्मा आणि महिला संघ (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स (MI) रविवारी महिला प्रीमियर लीग (WPL) २०२३ च्या अंतिम फेरीत दिल्ली कॅपिटल्सशी भिडणार आहे. मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर सायंकाळी साडेसात वाजल्यापासून विजेतेपदाचा सामना रंगणार आहे. दरम्यान फायनलमध्ये उतरण्यापूर्वी ‘हिटमॅन’ रोहित शर्माने मुंबईच्या संघाला प्रोत्साहन देताना एक खास संदेश शेअर केला आहे.

दिल्ली कॅपिटल्सने ग्रुप स्टेजमध्ये चमकदार कामगिरी केली होती. त्यामुळे त्यांनी पॉइंट टेबलमध्ये पहिले स्थान पटकावले, ज्यामुळे त्यांनी थेट अंतिम फेरीत प्रवेश केला. दिल्लीने ८ पैकी ६ सामने जिंकले तर २ हरले. मुंबई इंडियन्सने ग्रुप स्टेजमधील ८ पैकी ६ सामने जिंकले आणि २ गमावले, परंतु त्यांचा नेट रनरेट दिल्लीपेक्षा कमी होता. त्यामुळे एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्सने यूपीचा ७२ धावांनी पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.

रोहितच्या खास संदेशाचा व्हिडिओ मुंबई इंडियन्सच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये रोहित म्हणतो, “मला आमच्या महिला संघाला फायनलसाठी शुभेच्छा देऊ इच्छितो. गेल्या चार आठवड्यांमध्ये तुम्ही सर्व ज्या प्रकारे खेळलात त्याचा मला खूप आनंद झाला. आता फायनल आहे आणि तुम्हाला रोज फायनल खेळण्याची संधी मिळणार नाही. त्यामुळे एकाच वेळी मजा करणे आणि वातावरणाचा आनंद घेणे महत्त्वाचे आहे. हे आश्चर्यकारक असणार आहे. आम्ही तुम्हाला चीयर करु. मैदानावर जा आणि आपले सर्वोत्तम द्या.”

मुंबई पुरुष संघाचे इतर खेळाडू सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा आणि टीम डेव्हिड यांनीही हरमन ब्रिगेडला शुभेच्छा दिल्या. सूर्यकुमार म्हणाला, “मुंबईच्या मुली पूर्ण फॉर्ममध्ये आहेत. एक कुटुंब म्हणून मी तुम्हाला डब्ल्यूपीएल फायनलसाठी शुभेच्छा देतो. मी तुम्हाला चीयर करण्यासाठी उत्सुक आहे.” तिलक म्हणाला, “मुंबई इंडियन्सच्या महिला संघाला शुभेच्छा. आम्ही तुम्हाला पाठिंबा देत आहोत आणि पहिले विजेतेपद जिंकण्याची आशा आहे.” डेव्हिड म्हणाला, “अंतिम फेरीसाठी एमआय महिला संघाला शुभेच्छा. आतापर्यंतचा हा हंगाम अप्रतिम राहिला आहे.”

दोन्ही संघांचे स्कॉड –

दिल्ली कॅपिटल्स संघ: मेग लॅनिंग (कर्णधार), शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, मारिझान कॅप, एलिस कॅप्स, जेस जोनासेन, अरुंधती रेड्डी, तान्या भाटिया (यष्टीरक्षक), राधा यादव, शिखा पांडे, पूनम यादव, जसिया अख्तर, लॉरा हॅरिस, तारा नॉरिस, मिन्नू मणी, अपर्णा मंडल, टीटा साधू, स्नेहा दीप्ती

मुंबई इंडियन्स संघ: हेली मॅथ्यूज, यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), नॅट सायव्हर-ब्रंट, हरमनप्रीत कौर (कर्णधार), मेली केर, पूजा वस्त्राकर, इस्सी वाँग, अमनजोत कौर, हुमैरा काझी, जिंतीमनी कलिता, सायका इशाक, हीदर ग्रॅहम, क्लोए ट्रायटन धारा गुर्जर, सोनम यादव, नीलम बिश्त, प्रियांका बाला

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-03-2023 at 16:38 IST

संबंधित बातम्या