Rohit Sharma World Record in ODI cricket IND vs SA: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला वनडे सामना रांचीमध्ये खेळवला जात आहे. या मालिकेतील पहिल्याच सामन्यात रोहित शर्माने मोठा विश्वविक्रम आपल्या नावे केला आहे. रोहित शर्मा व विराट कोहलीच्या जोडीने भारतीय संघाचा डाव सावरत शतकी भागीदारी रचली. हिटमॅनने पाकिस्तानच्या शाहीद आफ्रिदीला मागे टाकत वनडे क्रिकेटमध्ये अशी अनोखी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज ठरला आहे.

रोहित शर्माने दक्षिण आफ्रिकेविरूद्ध पहिल्या वनडे सामन्यात सलग दोन षटकार लगावत शाहीद आफ्रिदीच्या वनडेमधील षटकारांच्या विक्रमाशी बरोबरी साधली. यानंतर हिटमॅनने अर्धशतक झळकावल्यानंतर त्याच्या ताफ्यातील खास पूल शॉट लगावत ऐटीत षटकारांचा विक्रम आपल्या नावे केला.

रोहित शर्माने एकदिवसीय क्रिकेटमध्ये इतिहास घडवला आहे. तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये नवा षटकारांचा बादशाह ठरला आहे. त्याने पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीला मागे टाकत आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार लगावणारा जगातील पहिला फलंदाज बनला आहे.

रोहित शर्माने आता एकदिवसीय क्रिकेटमध्ये ३५२ षटकार लगावले आहेत. त्याने २७७ एकदिवसीय सामन्यांमधील २६९ डावांमध्ये हा विक्रम केला आहे. दुसरीकडे, शाहिद आफ्रिदीने ३९८ एकदिवसीय सामन्यांमधील ३६९ डावांमध्ये ३५१ षटकार लगावण्याचा विक्रम केला होता. शाहिद आफ्रिदीचा हा विक्रम गेल्या १० वर्षांपासून कायम होता, जो आता रोहित शर्माने मोडला आहे.

वनडे क्रिकेट इतिहासात सर्वाधिक षटकार लगावणारे फलंदाज

रोहित शर्मा – ३५२ षटकार
शाहीद आफ्रिदी – ३५१ षटकार
ख्रिस गेल – ३३१ षटकार
सनथ जयसूर्या – २७० षटकार
एम एस धोनी – २२९ षटकार

रोहित शर्मा एका संघासाठी सर्वाधिक षटकार लगावणारा पहिला फलंदाज

रोहित शर्मा एका संघासाठी ३५० षटकार मारणारा जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. रोहितने भारतासाठी एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक ३५१ षटकार मारले आहेत, तर शाहिद आफ्रिदीने पाकिस्तानसाठी एकदिवसीय सामन्यांमध्ये ३५१ षटकारांपैकी ३४९ आणि आयसीसीसाठी २ षटकार मारले आहेत.

एका संघासाठी सर्वाधिक एकदिवसीय षटकार लगावणारे फलंदाज

३५२* षटकार – रोहित शर्मा, भारत
३४९ षटकार – शाहिद आफ्रिदी, पाकिस्तान
३३० षटकार – ख्रिस गेल, वेस्ट इंडिज
२६८ षटकार – सनथ जयसूर्या, श्रीलंका
२२२ षटकार – एमएस धोनी, भारत