scorecardresearch

Premium

WTC Final IND vs AUS: विराट- रोहितसाठी चार वर्षांनी अनुष्का व रितिका एकत्र..WTC फायनलचा ‘तो’ फोटो पाहून फॅन्स म्हणतात, भांडण संपलं?

India vs Australia, WTC 2023 Final: रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेह आणि विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२१-२३ चा अंतिम सामना पाहण्यासाठी स्टेडियमवर पोहोचल्या आहेत. लंडनमधील ओव्हल येथे हा सामना होत आहे.

WTC Final IND vs AUS: Ritika-Anushka appear in WTC final together is their feud over after 4 years
सौजन्य- हॉटस्टार (ट्वीटर)

WTC 2023 Final India vs Australia: आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२१-२३चा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लंडनमधील ओव्हल मैदानावर खेळला जात आहे. भारताने नाणेफेक जिंकून कर्णधार रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. हा सामना पाहण्यासाठी भारतीय क्रिकेटपटूंच्या पत्नीही स्टेडियममध्ये पोहोचल्या आहेत. यादरम्यान रोहितची पत्नी रितिका आणि विराटची पत्नी अनुष्का यांना एकत्र पाहून चाहते खुश झाले होते. रितिका आणि अनुष्काचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ आमनेसामने आहेत. दोघांमध्ये विजेतेपदाची लढाई सुरूच आहे. फायनलच्या पहिल्या दिवशी स्टँडचा असाच एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे, त्यानंतर विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा आणि कॅप्टन रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेह यांच्यातील भांडण संपल्याचे बोलले जात आहे. खरे तर या दोघांमध्ये भांडण झाल्याची अफवा अनेकवेळा पसरलेली होती, अशा परिस्थितीत दोघांना एकत्र पाहून चाहत्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही.

thackeray group organizes hou de charcha event in kalyan dombivali
कल्याण-डोंबिवलीत ‘होऊ द्या चर्चां’च्या चौक सभा; शिवसेना ‘उबाठा’तर्फे आयोजन
Rishi Sunak and Akshata Murthy
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या पत्नी अक्षता मूर्ती यांचा G20 मधून परतताच मोठा निर्णय, ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का
The employee boarded the truck to collect the toll from the truck driver
ट्रक चालकाकडून टोलचे पैसे घेण्यासाठी कर्मचारी चढला चालत्या ट्रकवर; Video पाहून हसू आवरणार नाही…
aditya thackeray letter to bmc commissioner demand to disposed accumulated waste in city
मुंबईत साचलेल्या कचऱ्याच्या ढिगांची विल्हेवाट लावावी; आदित्य ठाकरे यांचे मुंबई महानगरपालिका आयुक्तांना पत्र

खरं तर, काही दिवसांपासून रितिका आणि अनुष्काबद्दल अशा बातम्या येत होत्या की, दोघांमध्ये सर्व काही ठीक नाही. २०१९ पासून रोहितने कोहली आणि अनुष्काला इन्स्टावर अनफॉलोही केले होते. यानंतर कोहली आणि अनुष्कानेही एक गुप्त संदेश पोस्ट केला, मात्र ही अफवा होती. ४ वर्षांपूर्वी पत्रकार परिषदेत रितिका आणि अनुष्काबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. त्यावर रवी शास्त्रींनी. “असे प्रश्न विचारू नयेत” म्हणत पुढे ढकलले होते.

एवढेच नाही तर रितिका आणि अनुष्का दोघीही क्वचितच एकत्र दिसल्या. जरी दोघेही स्टेडियममध्ये उपस्थित असले तरी दोघेही अनेकदा वेगळे बसलेले दिसतात. रितिका अनेकदा तिच्या मुलीसोबतचे मॅचचे फोटो सोशल मीडियावर शेअर करते, पण तिच्या फोटोमध्ये अनुष्का कधीच दिसली नाही. बऱ्याच दिवसांनी दोघे एकाच स्टँडमध्ये दिसले. याफोटोंमुळे दोघांमध्ये सर्व काही ठीक असल्याचं चाहत्यांचे म्हणणे आहे.

भारताला हेड-स्मिथची जोडी फोडण्यात यश

ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवसाच्या ३२७ धावसंख्येवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. ट्रॅव्हिस हेडनंतर स्टीव्ह स्मिथनेही आपले शतक पूर्ण केले. दुस-या दिवसाचा खेळ सुरू झाल्यानंतर स्मिथने दोन चौकार मारून शतक ठोकले. या मैदानावरील त्याचे हे तिसरे शतक आहे. स्मिथचे शतक होताच भारतीय गोलंदाजांना जोडी फोडण्यात यश आले. मोहम्मद सिराजने ट्रॅव्हिस हेडला यष्टिरक्षक श्रीकर भरतकरवी झेलबाद केले. ट्रॅव्हिस हेडने १७४ चेंडूत १६३ धावा केल्या. त्याच्या खेळीत २५ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता.

हेही वाचा: WTC Final IND vs AUS: स्मिथ-हेडची जोडी जबरदस्त! सर डॉन ब्रॅडमन यांच्याशी संबंधित ९३ वर्षे जुना विक्रम मोडला

पाठोपाठ मोहम्मद शमीने भारताला पाचवे यश मिळवून दिले आहे. त्याने कॅमेरून ग्रीनला दुसऱ्या स्लिपमध्ये शुबमन गिलकरवी झेलबाद केले. ग्रीनने ७ चेंडूंत एका चौकाराच्या मदतीने ६ धावा केल्या. दुसऱ्या दिवशी पहिल्याच सत्रात दोन गडी बाद करत भारतीय संघाने सामन्यात थोडेसे पुनरागमन केले. सध्या ऑस्ट्रेलियाची धावसंख्या ९५ षटकांत ५ बाद ३७६ अशी आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Rohits wife ritika and virats wife anushka appeared together in wtc final photos viral on social media avw

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×