दुबई : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये सोमवारी राजस्थान रॉयल्सशी आव्हान संपुष्टात आलेल्या सनरायजर्स हैदराबाद संघाशी गाठ पडणार आहे. या लढतीद्वारे फलंदाजीत सुधारणा करून बाद फेरीतील शर्यतीत टिकून राहण्यावर राजस्थानचा भर असेल.

राजस्थानला मागील लढतीत कर्णधार संजू सॅमसनच्या अर्धशतकानंतरही दिल्लीविरुद्ध पराभव पत्करावा लागला. त्यामुळे सॅमसनवरील दडपणात वाढ झाल्याने अन्य फलंदाजांनी कामगिरी उंचावण्याची नितांत गरज आहे.

’ वेळ : सायंकाळी ७.३० वा.

’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स १ हिंदी