आठवडाभराहून अधिक काळापासून सुरु असणाऱ्या युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर युक्रेनला मदतीचा ओघ सुरु झालाय. अनेक देश आणि आंतरराष्ट्रीय संस्था या युद्धग्रस्त देशाला मदत करत असतानाच आता एका रशियन व्यक्तीनेही यासाठी पुढाकार घेतलाय. या रशियन व्यक्तीचं नाव आहे रोमन अब्रामोविच. आता ही व्यक्ती कोण आहे असं विचाराल तर जगप्रसिद्ध चेल्सी फुटबॉल क्लबचे मालक अशी या व्यक्तीची ओळख आहे. बुधवारी रोमन यांनी ‘फार कठीण’ निर्णय मी घेतला असून प्रिमियर लीग क्लब विकाण्याचं ठरवलंय, असं जाहीर केलं. रोमन यांनी पत्रक जारी करुन हा निर्णय जाहीर केला आहे.

नक्की वाचा >> Ukraine War: पुतिन यांचा मोदींना कॉल, रशियाने केला धक्कादायक दावा; म्हणाले, “युक्रेननेच भारतीय…”

२००३ पासून आहेत मालक
हा प्रसिद्ध क्लब विकून येणारा सर्व पैसा युक्रेनमधील युद्धग्रस्तांना मदत म्हणून देण्यात येईल. चॅम्पियन्स लीगमधील या क्लबच्या भागीदारांसाठी आपण या क्लब मधून बाहेर पडणं फार फायद्याचं राहिलं असं रोमन यांचं म्हणणं आहे. २००३ पासून या क्लबचे मुख्य मालक रोमन हे आहेत. रोमन यांनी चेल्सी क्लबची मालकी चॅरेटेबल ट्रस्टकडे देणार असल्याचं म्हटलंय. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर रोमन यांनी हा निर्णय घेतलाय.

gukesh d creates history becomes youngest Player to win fide candidates title zws
गुकेशला ऐतिहासिक जेतेपद; नामांकितांना मागे सोडत ‘कँडिडेट्स’मध्ये अजिंक्य; जगज्जेतेपदाच्या लढतीसाठी पात्र
Bernd Holzenbein dead at 78
माजी फुटबॉलपटू होल्झेनबाइन यांचे निधन
Real Madrid and Manchester City draw match
चॅम्पियन्स लीग फुटबॉल : रेयाल-मँचेस्टर सिटीतील रंगतदार लढत बरोबरीत
Candidates Chess Tournament D Gukesh defeated Fabiano Caruana
कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा: गुकेश अपराजितच! अग्रमानांकित कारुआनाला बरोबरीत रोखले; विदित, हम्पी पराभूत

लाइव्ह अपडेट्स >> युद्धाच्या लाइव्ह अपडेट्ससाठी येथे क्लिक करा

१९ मोठ्या स्पर्धा जिंकल्या…
“मी कायमच क्लबला फायद्याचे ठरतील असे निर्णय घेतलेत. सध्याची परिस्थिती पाहता मी हा क्लब विकण्याचा निर्णय घेतलाय. हेच क्लबच्या हितासाठी, चाहत्यांसाठी, कर्मचाऱ्यांसाठी तसेच प्रायोजक आणि भागीदारांसाठी योग्य आहे,” असं रोमन म्हणालेत. मागील दोन दशकांपासून चेल्सी क्लब हा फुटबॉलमधील नावाजलेला क्लब म्हणून नावारुपास आलाय आणि त्याचे कोट्यावधी चाहते जगभरात आहेत. या क्लबने १९ मोठ्या स्पर्धा रोमन यांच्या कालावधीत जिंकल्यात. यामध्ये दोन चॅम्पियन्स लीग चषक आणि पाच प्रिमियर लीग चषकांचा समावेश आहे. मात्र आता या ५५ वर्षीय मालकाने रशियाने शेजारच्या युक्रेनवर केलेल्या हल्ल्यामध्ये मदत करण्यासाठी क्लब विकाण्याचं ठरवलंय.

नक्की वाचा >> Ukraine War: “भारत, पाकिस्तान, चीन सरकारने मॉस्कोवर…”; युक्रेन सरकारनं केलं आवाहन

पुतिन कनेक्शन…
रोमन यांचे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी फार जवळचे संबंध असल्याचं सांगितलं जातं. मात्र मागील काही दिवसांपासून ब्रिटीश आणि पाश्चिमात्य देशांबरोबरच युरोपीय देशांनी रशियन कंपन्या, व्यक्ती, मालक आणि उद्योजकांवर निर्बंध लादण्यास सुरुवात केलीय. यामध्ये रोमन यांचं नाव कुठेच नाहीय. तरीही त्यांनी आपल्यावरही निर्बंध येतील आणि ते निर्बंध येण्याआठी क्लब विकून निधी युक्रेनमधील युद्धग्रस्तांना देण्याचा निर्णय घेतलाय. रोमन हे क्लबबरोबरच आपली लंडनमधील संपत्तीही विकणार आहेत.

नक्की वाचा >> Ukraine War: मोठी बातमी! पुतिन यांनी Nuclear Attack च्या भीतीने आपल्या कुटुंबियांना…

ट्रस्ट स्थापन करण्याचे निर्देश
मागील महिन्यामध्ये रोमन यांनी आबूधाबीमधील क्लब वर्ल्डकप स्पर्धेमध्ये संघाचं समर्थन करण्यासाठी हजेरी लावली होती. “तातडीने हा क्लब विकला जाणार नाहीय. नसून विक्रीची प्रक्रिया सुरु झालीय. मी या क्लबवर असणारं कर्ज फेडण्याची मागणी करत नाहीय. हा क्लब म्हणजे माझ्यासाठी केवळ उद्योग किंवा पैशाचं माध्यम नव्हतं तर खेळ आणि क्लबसाठी असणारं प्रेम मला महत्वाचं होतं. मी माझ्या टीमला एका चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना करण्यास सांगितलं आहे ज्या माध्यमातून विक्रीतून मिळेला पैसा दान म्हणून दिला जाईल. या ट्रस्टच्या माध्यमातून क्लब विक्रीतून आलेला पैसा युक्रेन युद्धातील पीडितांना मदत म्हणून दिला जाईल. यामध्ये तातडीने लागणाऱ्या निधीपासून दिर्घकालीन प्रकल्पांसाठीही निधी पुरवाला जाईल,” असं रोमन म्हणालेत.

क्लब आणि क्लबचे चाहते…
रोमन यांनी १४० मिलियन ब्रिटीश पौंडांना हा क्लब विकत घेतला होता. “क्लब विकण्याचा निर्णय माझ्यासाठी फार कठीण होता. तसेच क्लबपासून अशापद्धतीने दूर जाणं मला फार वेदना देणारं आहे. मात्र चेल्सी क्लबसोबत राहणं आणि या कालावधी मिळवलेलं यश हे आयुष्यभर माझ्यासोबत राहणार आहे. या सर्व विजयांवर मला अभिमान आहे. हे क्लब आणि त्याचे समर्थकांना कायमच माझ्या मनात स्थान असेल,” असंही रोमन म्हणाले आहेत.