रोनाल्डोच्या मँचेस्टर युनायटेडचा पराभव

युनायटेडचा आघाडीचा खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो सलग तिसऱ्या प्रीमियर लीग सामन्यात गोल करू शकला नाही

लिस्टर : लिस्टर सिटीने इंग्लिश प्रीमियर लीग फुटबॉलच्या सामन्यात मँचेस्टर युनायटेडचा ४-२ असा पराभव केला. लिस्टरकडून युरी टिलेमन्स (३१वे मिनिट), कॅगलर सोयूंचू (७८वे मि.), जेमी वार्डी (८३वे मि.) आणि पँटसन डाका (९०+१वे मि.) यांनी गोल झळकावले. युनायटेडचे दोन गोल मेसन ग्रीनवूड (१९वे मि.) आणि मार्कस रॅशफोर्ड (८२वे मि.) यांनी केले. युनायटेडचा आघाडीचा खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो सलग तिसऱ्या प्रीमियर लीग सामन्यात गोल करू शकला नाही. अन्य लढतींत, गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेल्या चेल्सीने बेन चिलवेलच्या गोलमुळे ब्रेंटफर्डला १-० असे पराभूत केले. मँचेस्टर सिटीने बर्नलीचा २-० असा पराभव केला.

एसी मिलानची विजयी घोडदौड

मिलान : एसी मिलानने इटलीतील फुटबॉल स्पर्धा ‘सेरी ए’च्या सामन्यात व्हेरोनावर ३-२ असा निसटता विजय मिळवला. हा मिलानचा सलग तिसरा आणि आठ सामन्यांत सातवा विजय ठरला. जिआँलुका कॅप्रारी (७वे मि.) आणि अँटोनिन बाराक (२४वे मि.) यांनी केलेल्या गोलमुळे या सामन्यात व्हेरोनाकडे २-० अशी आघाडी होती. उत्तरार्धात मात्र मिलानने उत्कृष्ट खेळ केला. ऑलिव्हिएर जिरूड (५९वे मि.), फ्रँक केसी (७६वे मि.) यांच्यासह कोरे गंटरच्या (७८वे मि.) स्वयंगोलमुळे मिलानने हा सामना जिंकला. दुसरीकडे, लॅझिओने इंटर मिलानला ३-१ अशी धूळ चारली. त्यांचे गोल कर्णधार चिरो इमोबिले (६४वे मि.), फिलिपे अँडरसन (८१वे मि.) आणि सर्गे मिलिंकोव्हिच-सॅव्हिच (९०+१वे मि.) यांनी केले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ronaldo manchester united defeated by leicester city zws

Next Story
विजयी भव !
ताज्या बातम्या