scorecardresearch

हॅमीश रुदरफोर्डचे पदार्पणात शतक, न्यूझीलंड सुस्थितीत

हॅमीश रुदरफोर्डने पदार्पणातच झळकावलेल्या शानदार शतकाच्या जोरावर न्यूझीलंडने इंग्लडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत तिसऱ्या दिवशी ७ बाद ४०२ अशी मजल मारली. इंग्लंडचा पहिला डाव अवघ्या १६७ धावांत गुंडाळणाऱ्या न्यूझीलंडकडे २३५ धावांची आघाडी आहे.

बिनबाद १३१ वरून पुढे खेळणाऱ्या न्यूझीलंडची सुरुवात चांगली झाली नाही. पीटर फुल्टन ५५ धावा करून अँडरसनच्या गोलंदाजीवर बाद झाला. यानंतर रुदरफोर्डला साथ मिळाली ती केन विल्यमसनची. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ९१ धावांची भागीदारी केली. या दरम्यान रुदरफोर्डने आपले पहिलेवहिले शतक पूर्ण केले. पानेसरने विल्यमसनला त्रिफळाचीत करत ही जोडी फोडली. यानंतर लगेचच रुदरफोर्डला अँडरसनने बाद केले. त्याने २२ चौकार आणि ३ षटकारांसह १७१ धावांची खेळी केली. पदार्पणातली ही सातव्या क्रमांकाची सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्या ठरली. न्यूझीलंडसाठी पदार्पणात शतक झळकावणारा रुदरफोर्ड नववा खेळाडू ठरला.
रुदरफोर्ड बाद झाल्यानंतर रॉस टेलर आणि डीन ब्राऊनली यांनी सुरुवात तर चांगली केली. मात्र मोठी खेळी करण्यात दोघांनाही अपयश आले. टेलरला ३१ धावांवर, तर ब्राऊनलीला २७ धावांवर अँडरसनने बाद केले. ब्रॅडले वॉटलिंगला स्टुअर्ट ब्रॉडने शून्यावरच बाद केले. पावसामुळे खेळ थांबला तेव्हा ब्रेंडान मॅक्युल्लम ४४, तर ब्रुस मार्टिन १७ धावांवर खेळत आहे. अँडरसनने सर्वाधिक ४ बळी टिपले.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या