Rowman Powell 5 Sixes Video: वेस्ट इंडिजचा आक्रमक फलंदाज रोमन पॉवेल हा आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. मोठे फटके खेळण्यासाठी ओळखला जाणाऱ्या पॉवेलने एकाच षटकात लागोपाठ ५ खणखणीत षटकार खेचले. त्याच्याकडे युवराज सिंगचा सलग ६ षटकार मारण्याचा रेकॉर्ड मोडण्याची सुवर्णसंधी होती. पण हा रेकॉर्ड थोडक्यात हुकला. त्याने ५ षटकार तर खेचले होते, पण सहाव्या चेंडूवर षटकार खेचणार, इतक्यात तो बाद झाला. त्याच्या ५ षटकारांचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

हा कारनामा रोमन पॉवेलने अमेरिकेत सुरू असलेल्या मेजर लीग क्रिकेट स्पर्धेत केला आहे. या स्पर्धेतील सहावा सामना सिएटल ऑर्कर्स आणि लॉस एंजेलिस नाईट रायडर्स या दोन्ही संघांमध्ये पार पाडला. या सामन्यात रोमन पॉवेल पाचव्या क्रमांकांवर फलंदाजी करण्यासाठी आला होता. त्याने १७ व्या षटकात सिएटल ऑर्कर्स संघाच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. सिएटल ऑर्कर्स संघाकडून श्रीलंकेचा गोलंदाज दासून शनाका गोलंदाजी करण्यासाठी आला होता. याच षटकातील सुरुवातीच्या ५ चेंडूंवर त्याने खणखणीत ५ षटकार खेचले.

शेवटच्या चेंडूवर काय झालं?

तर झाले असे की, लॉस एंजेलिस कोलकाता नाईट रायडर्स संघाने १६ व्या षटकात १३८ धावा केल्या होत्या. त्यानंतर १७ व्या षटकात रोमन पॉवेलने सामना फिरवला. या षटकात रोमन पॉवेलचा रुद्रावतार पाहायला मिळाला. यादरम्यान त्याने मारलेला एक षटकार हा १०५ मीटर लांब होता. पण शेवटच्या चेंडूवर तो बाद झाला. त्यामुळे युवराज सिंगच्या ६ षटकारांच्या रेकॉर्डची बरोबरी करण्याची संधी थोडक्यात हुकली.

या सामन्यात पॉवेलच्या खेळीच्या बळावर नाईट रायडर्सचा संघ १३८ वरून १६८ धावांवर पोहोचला होता. नाईट रायडर्सकडे २०० धावांचा डोंगर उभारण्याची संधी होती. पण नाईट रायडर्स संघाला २० षटकात १९६ धावांपर्यंत मजल मारता आली.

या धावांचा पाठलाग करताना सिएटल ऑर्कर्स संघाचा डाव १५.३ षटकात ११५ धावांपर्यंत मजल मारता आली. हा सामना सिएटल संघाने ८१ धावांनी विजय मिळवला.