Three Teams Loses Championship In IPL : इंडियन प्रीमियर लीगचा यंदाचा सीजन ३१ मार्चपासून सुरु होत आहे. आयपीएलच्या १५ वर्षांच्या इतिहासात काही टीम अशा आहेत, ज्यांनी एक दोन नव्हे तर तीन-चारवेळा आयपीएलचं किताब जिंकलं आहे. पण काही टीम अशा आहेत, ज्यांना एकदाही आयपीएल चॅम्पियन बनता आलं नाही. यामध्ये टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीचा संघ आरसीबी, दिल्ली कॅपिटल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांचा समावेश आहे. या संघांना आयपीएलवर जेतेपदाचं शिक्कामोर्तब का करता आलं नाही, याबाबत जाणून घेऊयात सविस्तर माहिती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दिल्ली कॅपिटल्स, रॉयल चॅलेंजर्स बॅंगलोर आणि किंग्ज इलेव्हन पंजाब या संघाच्या खराब प्रदर्शनामुळं त्यांना आयपीएलचं चॅम्पियन बनता आलं नाही. आरसीबी, पंजाब आणि दिल्ली आयपीएल इतिहासातील सर्वात जास्त सामन्यांमध्ये पराभव झालेले संघ आहेत. ज्यामुळे या संघांना आतापर्यंत आयपीएलमध्ये जेतेपद मिळवता आलं नाही. जाणून घेऊयात आयपीएलमधील या संघांच्या कामगिरीबाबत.

नक्की वाचा – ‘त्या’ सामन्यात एकच षटकार ठोकला अन् गड्यानं इतिहास रचला, फलंदाजाचं नाव वाचून तुम्हीही व्हाल थक्क

आरसीबी

आरसीबीला आयपीएलमध्ये एकादाही चॅम्पियन बनता आलं नाही, तरी या संघाची लोकप्रियता आयपीएलच्या प्रत्येक सीजनमध्ये खूप दिसून येते. या संघांत धाकड खेळाडूंची पलटण आहे. विराट कोहली-एबी डिविलियर्सने आरसीबीला आयपीएलमध्ये जेतेपद जिंकून देण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, पण त्यांच्या प्रयत्नांना यश आलं नाही. आरसीबीने आयपीएलमध्ये एकूण २२७ सामने खेळले आहेत. ज्यामध्ये ११९ सामन्यांमध्ये आरसीबीला विजय संपादन करता आलं आहे. तसंच २००९, २०११ आणि २०१६ मध्ये आरसीबीला आयपीएलच्या फायनलपर्यंत मजल मारता आली होती.

किंग्ज इलेव्हन पंजाब

आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब टीमलाही जेतेपदावर शिक्कामोर्तब करता आलं नाही. पंजाबच्या टीमने आयपीएलमध्ये २१८ सामने खेळले असून ९८ सामन्यांमध्ये त्यांनी विजय संपादन केलं आहे. तर ११६ सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. २०१४ मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबने आयपीएलच्या फायनलमध्ये प्रवेश केला होता. पंजाबचा सामन्यांमध्ये विजय मिळण्याची सरासरी पन्नास टक्क्यांच्या जवळपास आहे.

दिल्ली कॅपिटल्स

आयपीएलच्या १५ वर्षांच्या इतिहासात दिल्ली कॅपिटल्सला एकदाही चॅम्पियन होता आलं नाही. दिल्ली कॅपिटल्सचा संघ एकदाही आयपीएलच्या फायनलमध्ये प्रवेश करु शकला नाही. त्यामुळे दिल्लीचा आयपीएलमध्ये आतापर्यंत खराब प्रदर्श झालं आहे. दिल्ली कॅपिटल्सने आयपीएलमध्ये २१६ सामने खेळले आहेत. यापैकी ९६ सामन्यांमध्ये दिल्लीने विजय मिळवला असून ११४ सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Royal challengers bangalore delhi capitals and kings xi punjab never won ipl title know the reason behind it nss
First published on: 25-03-2023 at 17:17 IST