Royal Challengers Bangalore’s Will Jacks ruled out:आयपीएल २०२३ या स्पर्धेला ३१ मार्चपासून सुरूवात होणार आहे, परंतु अनेक खेळाडू स्पर्धा सुरु होण्यापूर्वी दुखापतींच्या कारणामुळे बाहेर पडले आहेत. त्यामुळे काही फ्रँचायझींना मोठा फटका बसला आहे. अशात आरसीबी संघाला देखील मोठा धक्का बसला आहे. कारण आरसीबीचा खेळाडू विल जॅक दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर पडला आहे. डिसेंबरमध्ये झालेल्या लिलावात जॅकला रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने ३.२ कोटींमध्ये करारबद्ध केले होते.

त्याला मधल्या फळीत ग्लेन मॅक्सवेलला कव्हर द्यायचे होते, पण बांगलादेशविरुद्ध मीरपूर येथे झालेल्या दुसऱ्या वनडेत क्षेत्ररक्षण करताना त्याला दुखापत झाली. या आठवड्याच्या सुरुवातीला स्कॅन आणि तज्ञांशी सल्लामसलत केल्यानंतर त्याला आयपीएलमधून माघार घ्यावी लागली आहे.

IPL 2024 Royal Challengers Bengaluru vs Sunrisers Hyderabad Match Updates in Marathi
IPL 2024: “निम्म्या खेळाडूंना तर इंग्लिशही समजत नाही…” RCB संघासह मॅनेजमेंटवरही भडकला वीरेंद्र सेहवाग
IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
IPL 2024: लवकरच सगळेजण हार्दिक पंड्याचे गोडवे गातील; कायरॉन पोलार्ड हार्दिकच्या मागे भक्कम उभा
Shanshak Singh Performance in IPL 2024
IPL 2024 मध्ये ‘या’ खेळाडूने प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांना फोडलाय घाम, ५ डावात फक्त एकदाच झालाय आऊट
Actor Sonu Sood made an anonymous post about trolling of Hardik Pandya
IPL 2024 : एक दिवस कौतुक करायचं, दुसऱ्या दिवशी हुर्यो उडवायची अशी वागणूक देशाच्या हिरोंना देऊ नका – सोनू सूद

मायकेल ब्रेसवेलशी चर्चा –

ईएसपीएन क्रिकइंफोमधील वृत्तानुसार, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू मायकेल ब्रेसवेल याच्याशी जॅकची संभाव्य बदली म्हणून चर्चा करत आहे. ब्रेसवेल यापूर्वी कधीही आयपीएलमध्ये खेळलेला नाही. डिसेंबरच्या लिलावातही तो विकला गेला नाही, त्याची मूळ किंमत १ कोटी रुपये आहे. २ एप्रिलला मुंबई इंडियन्सविरुद्ध आरसीबीचा पहिला सामना होणार आहे.

घरच्या मैदानावर ४ वर्षांनंतर पहिलाच सामना –

बंगळुरूमधील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर त्यांच्या घरच्या मैदानावर मे २०१९ नंतरचा हा त्यांचा पहिला सामना असेल. रीस टोपले, जॅक सरे यांनाही आरसीबीने लिलावात करारबद्ध केले. हंगामाच्या सुरुवातीला ते वेळेत तंदुरुस्त होतील अशी अपेक्षा आहे. या हिवाळ्यात जॅकने तिन्ही आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमध्ये पदार्पण केले. बांगलादेशमध्ये एकदिवसीय पदार्पण करण्यापूर्वी त्याने पाकिस्तानमध्ये टी-२० आणि कसोटी कॅप्स मिळवली होती.

विल जॅक्सने १४० षटकार लगावले आहेत –

विल जॅक्स हा टी-२० चा जबरदस्त फलंदाज आहे. त्याने आतापर्यंत १०९ सामन्यांच्या १०२ डावांमध्ये २९.८० च्या सरासरीने २८०२ धावा केल्या आहेत. ज्यामध्ये १०८ धावांच्या नाबाद शतकी खेळीसह २३ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याच्या नावावर १४० षटकार ४९ चौकार आहेत. जॅक गोलंदाजीही करतो. त्याने ४२ डावात २६ विकेट्स घेतल्या आहेत. मात्र तो आतापर्यंत आयपीएल खेळलेला नाही.