RCB vs SRH Weather Update: आयपीएल २०२६ स्पर्धेला येत्या आजपासून सुरुवात होणार आहे. या सामन्यात रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली खेळणारा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ आणि इशान किशनच्या नेतृत्वाखाली खेळणारा सनरायझर्स हैदराबाद हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. या सामन्यावर सर्वांचं लक्ष लागून असणार आहे. कारण रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ पहिल्यांदाच गतविजेता संघ म्हणून आपल्या होम ग्राऊंडवर खेळण्यासाठी उतरणार आहे. दरम्यान बंगळुरूतील हवामान कसं असेल? जाणून घ्या.

बंगळुरू – हैदराबाद सामन्यात पाऊस हजेरी लावणार?

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन्ही संघांमध्ये होणारा सामना बंगळुरूतील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे, या सामन्यावेळी आभाळ मोकळं असेल. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना २०-२० षटकांचा सामना पाहायला मिळेल. ॲक्यूवेदरने दिलेल्या वृत्तानुसार, तापमान ३२ ते ३४ अंश सेल्सिअसच्या आसपास असेल. या सामन्यात पाऊस पडण्याची शक्यता नाहीच्या बरोबर आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद सामना किती वाजता सुरू होणार?

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होणारा सामना संध्याकाळी ७:३० वाजता सुरू होईल. तर नाणेफेक ७ वाजता सुरू होईल. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी रजत पाटीदारकडे आहे. तर सनरायझर्स हैदराबाद संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी इशान किशनकडे आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संपूर्ण संघ :

रजत पाटीदार (कर्णधार), विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, फिल सॉल्ट, जितेश शर्मा, क्रुणाल पंड्या, स्वप्नील सिंग, टीम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, जैकब बेथेल, जोश हॅजलवुड, यश दयाल, भुवनेश्वर कुमार, नुवान तुषारा, रसिख सलाम, अभिनंदन सिंह, सुयश शर्मा, व्यंकटेश अय्यर, जैकब डफी, सात्विक देसवाल, मंगेश यादव, जॉर्डन कॉक्स, विक्की ओस्टवाल विहान मल्होत्रा, कनिष्क चौहान

सनरायझर्स हैदराबादचा संपूर्ण संघ

पॅट कमिन्स, ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा (उपकर्णधार), अनिकेत वर्मा, आर स्मरण, इशान किशन (कर्णधार), हेनरिक क्लासेन, नितीश कुमार रेड्डी, हर्ष दुबे, कामिंदू मेंडिस, हर्षल पटेल, ब्रायडन कार्स, जयदेव उनाडकट, इशान मलिंगा, झीशान अन्सारी, शिवांग कुमार, सलील अरोरा, शाकिब हुसैन, ओमकार तरमळे, अमित कुमार, प्रफुल्ल हिंगे, क्रेन्स फुलेरा, लियाम लिव्हिंगस्टोन, शिवम मावी, जॅक एडवर्ड्स