रणजी करंडक स्पर्धेच्या २०१९-२० च्या हंगामात मुंबईचं आव्हान संपुष्टात आलं. स्पर्धेत आपलं आव्हान टिकवून ठेवण्यासाठी मुंबईला सौराष्ट्राविरुद्ध निर्णायक विजयाची गरज होती. दुसऱ्या डावात मुंबईने सौराष्ट्राच्या ७ फलंदाजांना झटपट माघारी धाडत विजयाच्या दिशेने एक पाऊल टाकलं होतं. मात्र कमलेश मकवाना आणि धर्मेंद्रसिंह जाडेजा यांनी अखेरच्या दिवसातलं शेवटचं सत्र खेळून काढत सौराष्ट्राचा पराभव टाळला.

या सामन्यात मुंबईच्या रोस्टन डायसच्या गोलंदाजीवर एक अनपेक्षित प्रसंग घडला. टप्पा पडून रोस्टनचा चेंडू स्विंग झाला आणि स्टम्पला लागला. चेंडू स्टम्पला लागल्याचा आवाज आल्यामुळे मुंबईकर खेळाडूंनी अपीलही केलं. पण प्रत्यक्षात बेल्स खाली न पडल्यामुळे कमलेश मकवानाला नाबाद ठरवण्यात आलं. पाहा हा व्हिडीओ…

कमलेश मकवाना या गोलंदाजीवर बाद झाला असता तर सामना मुंबईच्या दिशेने फिरला असता. मात्र मिळालेल्या जीवदानाचा फायदा घेत मकवाना आणि जाडेजा जोडीने उरलेली सर्व षटकं खेळून काढत मुंबईचं बाद फेरीतलं स्वप्न धुळीला मिळवलं.