राजस्थान रॉयल्सने गुजरात टायटन्सविरूद्ध सामन्यात २०व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर दणदणीत विजय मिळवला. मराठमोळ्या तुषार देशपांडेने उत्कृष्ट २०वं षटक टाकत राजस्थानला ६ धावांनी रोमांचक विजय मिळवून दिला. राजस्थानने दिलेल्या २११ धावांच्या लक्ष्यांचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सचा संघ २० षटकांत २०४ धावाच करू शकला. तुषार देशपांडेच्या अखेरच्या षटकापूर्वी रवी बिश्नोईचे ४ षटकांत ४ विकेट्स या सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरले.
अखेरच्या षटकात गुजरातला विजयासाठी ११ धावांची गरज होती. राजस्थानने अखेरचं षटक टाकण्याची जबाबदारी तुषार देशपांडेला गोलंदाजीची संधी दिली. तर फलंदाजीसाठी राशीद खान व कगिसो रबाडा मैदानावर होते. तुषार देशपांडेने पहिला चेंडू वाईट टाकला. यासह ६ चेंडूत ९ धावांची गरज होती. पहिल्या तिन्ही चेंडूवर सिंगल्स काढण्यात आल्या. त्यानंतर चौथा चेंडू डॉट बॉल राहिला. त्यानंतर तुषारच्या पाचव्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात रशीद खान झेलबाद झाला. रशीद बाद झाल्यानंतर अशोक शर्मा फलंदाजीला आला आणि अखेरचा चेंडू डॉट बॉल राहिल्याने राजस्थानने ६ धावांनी सामना जिंकला.
राजस्थानने दिलेल्या २११ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चांगली सुरूवात झाली. साई सुदर्शन व कुमार कुशाग्र यांनी ७८ धावांची भागीदारी रचली. कुमारने १४ चेंडूत ३ चौकारांसह १८ धावांची खेळी केली. साई सुदर्शनने ४४ चेंडूत ९ चौकार व ३ षटकारांसह ७३ धावांची खेळी केली. तर जोस बटलरने १४ चेंडूत ५ चौकार २६ धावा केल्या. त्यानंतर रवी बिश्नोईने इम्पॅक्ट प्लेअर म्हणून येत गुजरातला धक्के दिले.
राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. राजस्थानला वैभव सूर्यवंशी व यशस्वी जैस्वाल यांनी संघाला दणक्यात सुरूवात करून दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी ७० धावांची भागीदारी रचली. वैभव १८ चेंडूत ५ चौकार व एका षटकारासह ३१ धावा करत बाद झाला. यशस्वी जैस्वालने ३६ चेंडूत ६ चौकार व ३ षटकारासह ५५ धावा केल्या. ध्रुव जुरेलने ४२ चेंडूत ५ चौकार व ५ षटकारांसह ७५ धावा केल्या. तर शिमरॉन हेटमायरने १८ धावांचं योगदान दिलं, यासह राजस्थानने २१० धावांचा आकडा गाठला. गुजरातकडून कगिसो रबाडाने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या. तर सिराज, अशोक शर्मा, प्रसिध कृष्णा आणि रशीद खान यांनी १-१ विकेट्स घेतल्या.
