IPL 2026 Rajasthan Royals vs Mumbai Indians: गुवाहाटीतील बारसापारा क्रिकेट स्टेडियममध्ये राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स हे दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पाहायला मिळाला. या सामन्यात पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे हा सामना उशिराने सुरु करण्यात आला होता. मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या राजस्थानने ११ षटकात १५० धावा केल्या. यादरम्यान वैभव सूर्यवंशीने ३९ तर यशस्वी जैस्वालने नाबाद ७७ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करण्याासाठी आलेल्या मुंबईकडून एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. मुंबईला ११ षटकांअखेर १२३ धावा करता आल्या. यासह मुंबईने हा सामना २७ धावांनी गमावला.
IPL 2026 RR vs Mi: राजस्थान रॉयल्स विरूद्ध मुंबई इंडियन्स सामन्याचे हायलाईट्स.
RR vs MI Live: गुवाहाटीत राजस्थानचं 'राज'! मुंबई इंडियन्सला धूळ चारत राजस्थान रॉयल्सची विजयाची 'हॅट्रिक'
या सामन्यात १५१ धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या मुंबई इंडियन्सला ९ गडी बाद १२३ धावांपर्यंत मजल मारता आली आहे. यासह मुंबईने हा सामना २७ धावांनी गमावला.
RR vs MI Live : संदीप शर्माचा भन्नाट कॅच! रुदरफोर्ड परतला माघारी
रुदरफोर्डने ७ चेंडूत २५ धावा केल्या होत्या. पण संदीप शर्माने भन्नाट झेल घेऊन त्याला बाद करत माघारी धाडलं आहे.
RR vs MI Live: मुंबई इंडियन्सचा निम्मा संघ तंबूत! सामना जिंकणं कठीण
मुंबईचान निम्मा संघ तंबूत परतला आहे. तिलक वर्मा १४ धावांवर माघारी परतला आहे.
RR vs MI Live: हार्दिक पंड्या परतला माघारी
मुंबई इंडियन्सचे ४ फलंदाज माघारी परतले आहेत. हार्दिक पंड्या ९ धावांवर माघारी परतला आहे.
RR vs MI Live: संदीप शर्माच्या भन्नाट यॉर्करवर अशी पडली रोहित शर्माची विकेट
संदीप शर्माने भन्नाट यॉर्कर टाकून रोहित शर्माला पायचित करून माघारी धाडलं आहे. रोहितने अवघ्या ५ धावा केल्या
RR vs MI Live: मुंबई इंडियन्सला पहिल्याच षटकात पहिला मोठा धक्का! रिकल्टन परतला माघारी
मुंबई इंडियन्सला पहिला मोठा धक्का बसला आहे. रायन रिकल्टन ८ धावा करून माघारी परतला आहे.
RR vs MI Live: वैभव-यशस्वीचं वादळ! राजस्थानने मुंबईसमोर ठेवलं 'इतक्या' धावांचं आव्हान
या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सने ११ षटकात १५० धावा केल्या आहेत. मुंबईला हा सामना जिंकण्यासाठी १५१ धावा करायच्या आहेत.
RR vs MI Live: राजस्थान रॉयल्सला तिसरा धक्का! रियान पराग परतला माघारी
राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार रियान पराग २० धावांवर माघारी परतला आहे.
RR vs MI: वैभव सूर्यवंशीचा बुमराहच्या पहिल्या चेंडूवर गगनचुंबी षटकार! सर्वच जण चकित; जस्सीची प्रतिक्रिया तर...; VIDEO पाहाच
RR vs MI Live: राजस्थान रॉयल्स संघाला दुसरा धक्का
राजस्थान रॉयल्स संघाला दुसरा मोठा धक्का बसला आहे. ध्रुव जुरेल अवघ्या २ धावांवर माघारी परतला आहे.
RR vs MI Live: राजस्थान रॉयल्सला पहिला मोठा धक्का! वैभव सूर्यवंशी परतला माघारी
राजस्थान रॉयल्स संघाला पहिला मोठा धक्का बसला आहे. वैभव सूर्यवंशी ३९ धावांवर माघारी परतला आहे.
RR vs MI Live: राजस्थान रॉयल्सचं IPL मध्ये सर्वात वेगवान अर्धशतक!
राजस्थान रॉयल्स संघाने पहिल्या डावात फलंदाजी करताना २.४ षटकात संघाच्या ५० धावा पूर्ण केल्या आहेत.
RR vs MI Live: राजस्थान रॉयल्सची दमदार सुरूवात! पहिल्याच षटकात कुटल्या २२ धावा
राजस्थान रॉयल्सकडून पहिल्याच षटकात यशस्वी जैस्वालने २२ धावा कुटल्या आहेत.
MI playing 11: मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन
रोहित शर्मा, रायन रिकेल्टन (यष्टीरक्षक), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या (कर्णधार), नमन धीर, शार्दुल ठाकूर, दीपक चहर, अल्लाह गझनफर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह</p>
RR playing 11: राजस्थान रॉयल्सची प्लेईंग इलेव्हन
वैभव सूर्यवंशी, यशस्वी जैस्वाल, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रियान पराग (कर्णधार), शिमरॉन हेटमायर, डोनोवन फरेरा, रवींद्र जडेजा, जोफ्रा आर्चर, नांद्रे बर्गर, तुषार देशपांडे, संदीप शर्मा
मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स सामन्याची नाणेफेक मुंबईने जिंकली असून संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई इंडियन्सने या सामन्यासाठी प्लेईंग इलेव्हनमध्ये दोन मोठे बदल केले आहेत. हार्दिक पंड्या व ट्रेंट बोल्ट संघात परतले आहेत.
पाऊस थांबला असून, टॉस ९:५५ ला होणार आहे. तर सामना १० वाजून १० मिनिटांनी सुरू होईल. तर सामना ११ षटकांचा असेल. यानुसार पॉवरप्ले ३.२ षटकांचा असेल. ११ षटकांच्या सामन्यात ४ गोलंदाज २-२ षटकं आणि १ गोलंदाज ३ षटकं टाकू शकतात.
RR vs MI Live: पाऊस थांबला! सामना किती वाजता सुरु होणार?
इएसपीएन क्रिकइन्फोच्या अपडेटनुसार, पाऊस ९:३५ पर्यंत थांबेल, ९:४५ ला मैदानाची पाहणी केली जाईल आणि १०:१५ ला खेळ सुरु होऊ शकतो. हा सामना ८ षटकांचा होऊ शकतो.
"अरे ए, अचानक थंडी कशी पडली?", गुवाहाटीमधील वातावरण पाहून रोहित शर्माची भन्नाट प्रतिक्रिया; हार्दिक तर कुडकुडला; Video
RR vs MI Live: मुंबई विरूद्ध राजस्थान सामना रद्द होणार? वाचा लेटेस्ट अपडेट
गुवाहाटीत अजूनही पाऊस सुरु आहे. त्यामुळे सामना लवकर सुरु होण्याची शक्यता खूप कमी आहे. ८:४० पासून षटकं कमी करायला सुरुवात होणार आहे.
RR vs MI Live: गुवाहाटीत पावसाची हजेरी! टॉस किती वाजता होणार?
गुवाहाटीत अजूनही पाऊस सुरु आहे. त्यामुळे टॉस पुढे ढकलला आहे
पावसामुळे टॉस लांबणीवर
गुवाहाटीत पावसाची संततधार सुरू असल्याने मुंबई-राजस्थान सामन्याचा टॉस लांबणीवर गेला आहे.
जसप्रीत बुमराह विरुद्ध वैभव सूर्यवंशी
आताच्या घडीचा जगातला सर्वोत्कृष्ट गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि युवा धडाकेबाज सलामीवीर वैभव सूर्यवंशी यांच्यातील द्वंद्व पाहण्यासाठी चाहते आतूर आहेत. या सामन्याच्या निमित्ताने पहिल्यांदाच वैभव बुमराहचा सामना करणार आहे.
गुवाहाटीत पाऊस
गुवाहाटी इथे पाऊस सुरू असल्याने मुंबई-राजस्थान सामना नियोजित वेळी सुरू होण्याची शक्यता कमी आहे.
मुंबई-राजस्थानची दणक्यात सुरुवात
मुंबई इंडियन्सने तब्बल १३ वर्षानंतर हंगामातील पहिला सामना जिंकला. मात्र दुसऱ्या लढतीत त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं.
दुसरीकडे राजस्थानने रायन परागच्या नेतृत्वात खेळताना दोनपैकी दोन्ही सामने जिंकत आश्वासक सुरुवात केली आहे.
हार्दिक पंड्या खेळणार?
आजारी असल्यामुळे हार्दिक पंड्या दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या लढतीत खेळू शकला नव्हता. हार्दिकच्या अनुपस्थितीत सूर्यकुमार यादवने नेतृत्वाची धुरा सांभाळली होती.
हार्दिक नसल्यामुळे मुंबईने दीपक चहर आणि कार्बिन बॉश यांना संघात समाविष्ट केलं होतं. हार्दिक राजस्थानविरुद्धच्या लढतीसाठी उपलब्ध असल्याचं संघव्यवस्थापनाने स्पष्ट केलं आहे. हार्दिक संघात परतल्यास ट्रेंट बोल्टचं अंतिम अकरात पुनरागमन होऊ शकतं.
गुवाहाटीत पावसाचा खेळ?
सोमवारी कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्ज यांच्यातील लढत पावसामुळे रद्द करण्यात आली. कोलकातापासून काही तासांवर असलेल्या गुवाहाटी इथे मुंबई-राजस्थान सामना होणार आहे. गुवाहाटीतल्या या सामन्यावरही पावसाचं सावट आहे.

IPL 2026, RR vs MI: राजस्थान रॉयल्स विरूद्ध मुंबई इंडियन्स सामन्याचे हायलाईट्स
