scorecardresearch

नामांकित धावपटू लिडीया यांचे निधन

१९८०च्या दशकात आशियातील सर्वात वेगवान धावपटू अशी ख्याती मिळवणाऱ्या लिडीया डी वेगा यांचे कर्करोगाच्या आजाराने निधन झाले.

नामांकित धावपटू लिडीया यांचे निधन
लिडीया डी वेगा

मनिला : १९८०च्या दशकात आशियातील सर्वात वेगवान धावपटू अशी ख्याती मिळवणाऱ्या लिडीया डी वेगा यांचे कर्करोगाच्या आजाराने निधन झाले. त्या ५७ वर्षांच्या होत्या. १९८०च्या दशकातील धावण्याच्या शर्यतींवर लिडीया यांची जणू मक्तेदारी होती. त्यांनी आपल्या कारकीर्दीत १५ सुवर्णपदकांची कमाई केली. लिडीया यांनी १९८७ मध्ये १०० मीटर शर्यत जिंकताना ११.२८ सेकंद अशी सरस वेळ दिली होती. १९८२च्या नवी दिल्ली आणि १९८६च्या सेऊल अशा दोन आशियाई क्रीडा स्पर्धामध्ये तिने १०० मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकले.

भारताच्या दिग्गज धावपटू पी. टी. उषा आणि लिडीया यांच्यात पदकांसाठी कायम चुरस असायची. ८०च्या दशकातच उषा पूर्ण भरात होती. या कालावधीत २००, ४०० मीटर धावण्याची आणि ४०० मीटर अडथळा शर्यतीत उषाची बरोबरी करणे कोणालाही जमले नव्हते. मात्र, १०० मीटर शर्यतीत कायमच लिडीयाने उषाला मागे टाकले होते.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या