लंडन : युक्रेनमधील युद्धपीडितांच्या मदतीसाठी चेल्सी हा नामांकित फुटबॉल क्लब विकण्याचा निर्णय रशियाचा उद्योगपती रोमन इब्रामोव्हिच यांनी घेतला आहे.

मागील १९ वर्षांच्या काळात क्लबला कर्जरूपात दिलेले दीड अब्ज पौंड (२ अब्ज अमेरिकी डॉलर) परत करावेत अशी इब्रामोव्हिच यांची मागणी नाही. या निरंतर केलेल्या आर्थिक मदतीतून खरे तर युरोपातील सर्वात यशस्वी संघाचा नावलौकिक चेल्सी क्लबला गाठता आला आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.

vladimir putin threatens nuclear war
युक्रेनमध्ये सैन्य पाठवल्यास जागतिक अण्वस्त्र संघर्षांचा पुतिन यांचा इशारा
russian soldier
‘रशियात अडकलेल्या २० भारतीयांच्या सुटकेसाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न’, परराष्ट्र खात्याची माहिती
Pakistani Singer Shazia Manzoor Slaps Co host on Live Show
पाकिस्तानी गायिकेला ‘हनिमून’ विषयी विचारला प्रश्न; लाइव्ह शोमध्येच होस्टच्या कानाखाली लगावली, पाहा धक्कादायक व्हिडीओ
How did Indian young man go to fight in Russia-Ukraine war Will they be rescued
विश्लेषण : रशिया-युक्रेन युद्धात लढण्यासाठी भारतीय तरुण कसे गेले? त्यांची सुटका होणार का?

‘‘चेल्सी क्लबची विक्री करून मिळणारे निव्वळ उत्पन्न देणगी म्हणून देण्यासाठी धर्मादाय संस्थेची स्थापना करावी, असे निर्देश मी माझ्या चमूला दिले आहेत. युद्धाची झळ पोहोचलेल्या युक्रेनमधील नागरिकांना ही संस्था मदत करू शकेल,’’ असे इब्रामोव्हिच यांनी सांगितले.

रशियाचे क्रीडापटू पॅरालिम्पिकमधून बाहेर

बीजिंग : बीजिंग येथे शुक्रवारपासून रंगणाऱ्या हिवाळी पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेत रशिया आणि बेलारूसच्या क्रीडापटूंना सहभागी होता येणार नाही. आंतरराष्ट्रीय पॅरालिम्पिक समितीने बुधवारीच रशियन खेळाडूंना वैयक्तिकदृष्टय़ा स्पर्धेत खेळण्याची परवानगी दिली. परंतु स्पर्धेत सहभागी होणाऱ्या अन्य देशांनी याविरोधात नाराजी दर्शवल्यामुळे त्यांना निर्णय बदलावा लागला. हिवाळी पॅरालिम्पिकमध्ये रशियाचे ७१, बेलारूसचे १२ खेळाडू सहभागी होणार होते.

फॉर्मुला -वनचा रशियाशी करार रद्द

लंडन : युक्रेनवरील हल्ल्याच्या कृतीमुळे फॉम्र्युला-वनने रशिया ग्रां. प्रि. शर्यतीबाबतचा करार रद्द केला आहे. भविष्यात रशियात कोणतीही फॉम्र्युला-वन शर्यत होणार नाही, असे गुरुवारी संघटनेकडून स्पष्ट करण्यात आले. सोची येथे २५ सप्टेंबरला होणारी फॉम्र्युला-वन शर्यत संघटनेकडून आधीच रद्द करण्यात आली आहे. परंतु २०२५पर्यंतचा शर्यतीचा करारही संघटनेने रद्दबातल ठरवला आहे.