Ruturaj Gaikwad Named Unwanted Record: आयपीएल २०२६ स्पर्धेतील ४८ वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्स या दोन्ही संघांमध्ये सुरू आहे. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर सुरु असलेला हा सामना प्लेऑफमध्ये जाण्याच्या दृष्टीने दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा आहे. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान नाणेफेक गमावताच चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाडच्या नावे नकोसा रेकॉर्ड नोंदवला गेला आहे.
एमएस धोनीने चेन्नई सुपर किंग्स संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी सोडल्यानंतर ही जबाबदारी ऋतुराज गायकवाडकडे सोपवण्यात आली होती. तेव्हापासून ते ऋतुराज गायकवाड हा चेन्नई सुपर किंग्स संघाचा कर्णधार आहे. सुरुवातीला काही सामने जिंकून चेन्नईचा संघ तळाशी होता. पण गेल्या काही सामन्यांमध्ये चेन्नईने पुनरागमन केलं आहे. पण नाणेफेक जिंकण्याच्या बाबतीत ऋतुराज गायकवाड आतापर्यंत अनलकी राहिला आहे. २९ सामन्यानंतर सर्वाधिक वेळेस नाणेफेक गमावणाऱ्या कर्णधारांच्या यादीत ऋतुराज गायकवाड अव्वल स्थानी आहे.
ऋतुराज गायकवाडने आयपीएल स्पर्धेतील २९ सामन्यानंतर सर्वाधिक २१ वेळेस नाणेफेक गमावलं आहे. याबाबतीत त्याने केएल राहुलला मागे टाकलं आहे. केएल राहुलने २९ सामन्यानंतर २० वेळेस नाणेफेक गमावलं होतं. तर शुबमन गिलने आतापर्यंत १९ वेळेस नाणेफेक गमावलं आहे. तर या यादीत चौथ्या स्थानी असलेल्या संजू सॅमसनने १८ वेळेस नाणेफेक गमावलं आहे.
आयपीएल स्पर्धेतील २९ सामन्यानंतर सर्वाधिक वेळेस नाणेफेक गमावणारे कर्णधार
ऋतुराज गायकवाड – २१ वेळेस
केएल राहुल – २० वेळेस
शुबमन गिल – १९ वेळेस
संजू सॅमसन – १८ वेळेस
दिल्लीने केल्या १५५ धावा
या सामन्यात दिल्लीने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना दिल्लीकडून पथूम निसांकाने १९, केएल राहुलने १२, नितिश राणाने १५ आणि करूण नायरने १३ धावांची खेळी केली. त्यानंतर ट्रिस्टन स्टब्सने ३८ आणि समीर रिझवीने सर्वाधिक ४० धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर त्याने संघाची धावसंख्या १५५ धावांवर पोहोचवली.
