Ruturaj Gaikwad Sixes Viral Video: विजय हजारे ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व फेरीत भारतीय फलंदाज ऋतुराज गायकवाडने यूपीविरुद्ध नाबाद २२० धावांची खेळी केली. ज्यामध्ये १० चौकार आणि १६ षटकार लगावले. ऋतुराजने एकाच षटकात ७ षटकारांसह ४३ धावा करत विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे. एकाच षटकात प्रत्येक चेंडूवर व एका नो बॉलवरही त्याने षटकार लगावला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१४७ चेंडूत १६५ धावांवर फलंदाजी करताना गायकवाडने युपीच्या संघातील गोलंदाज शिवा सिंगच्या प्रत्येक बॉलवर षटकार लगावला. महाराष्ट्राच्या डावाच्या ४९ व्या षटकात ऋतुराजने ही कमाल करून दाखवली. त्यानंतर त्याने गोलंदाजाच्या डोक्यावरून आणखी एक मोठा शॉट मारला आणि नंतर सिंगच्या गोलंदाजीवर तो लाँग-ऑफवर दोनदा शॉट्स खेळला.

ऋतुराजने या विक्रमी कामगिरीनंतर बीसीसीआयशी संवाद साधताना सांगितले की, षटकातील पाचवा षटकार मारल्यानंतर फक्त एकच व्यक्ती माझ्या मनात आली आणि ते नाव म्हणजे- युवराज सिंग. T20 मध्ये एका षटकात सहा षटकार मारणारा युवराज हा पहिला भारतीय पहिला खेळाडू होता; 2007 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या टी-20 विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात ही कामगिरी केली होती.

ऋतुराज म्हणाला, “विश्वचषकादरम्यान मी लहान असताना त्याला एका षटकात सहा षटकार मारताना पाहिले होते. मला त्याच्याच सारखा विक्रम करायचा होता म्हणून पाचवा षटकार बसल्यावर ही सहावा चेंडूही उंच भिरकवण्याचं ठरवलं. सहा षटकार पूर्ण होताच मला खूप आनंद झाला. मी एका षटकात सहा षटकार मारेन, असेही मला कधीच वाटले नव्हते”.

ऋतुराज गायकवाडचे एका षटकात ७ षटकार

हे ही वाचा<< Video: तू गल्ली क्रिकेट…; ऋषभ पंतने हर्षा भोगलेंना दिलेलं ‘ते’ उत्तर ऐकून नेटकरी भडकले, पाहा ट्वीट्स

विजय हजारे ट्रॉफीच्या सामन्यात ऋतुराज गायकवाडने १०९ चेंडूत शतक पूर्ण केले. तसेच १३८ चेंडूत १५० धावांचा टप्पा गाठला. म्हणजेच त्याच्या पुढच्या ५० धावा फक्त २९ चेंडूत आल्या. १५९ चेंडूत २२० धावा केल्यानंतर तो नाबाद राहिला. त्याने अझीम काझीसोबत चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली होती. ऋतुराज गायकवाडने इंडियन प्रीमियर लीगमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. आतापर्यंत ऋतुराज १ एकदिवसीय आणि ९ टी-20 सामन्यांमध्ये टीम इंडियाकडून खेळला आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ruturaj gaikwad vijay hazare seven sixes viral video says i was thinking of special person after fifth six watch svs
First published on: 01-12-2022 at 13:29 IST