आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेत आणखी एक मोठा उलटफेर पाहायला मिळाला आहे. सुपर ८ फेरीत पहिल्यांदाच प्रवेश करणाऱ्या झिम्बाब्वेने श्रीलंकेला त्यांच्या होम ग्राऊंडवर पराभूत केलं आहे. या सामन्यात फलंदाजी करताना झिम्बाब्वेच्या रायन बर्लने तुफान फटकेबाजी केली. यादरम्यान त्याने आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेतील तिसरा सर्वात लांब षटकार खेचला. श्रीलंकेच्या दुनिथ वेलालागेच्या गोलंदाजीवर फलंदाजी करताना रायन बर्लने खणखणीत षटकार खेचला. या स्पर्धेतील लांब षटकाराचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

आयसीसी टी – २० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेत सर्वात लांब षटकार खेचण्याचा रेकॉर्ड हा भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याच्या नावावर आहे. हार्दिक पांड्याने नामिबियाविरुद्ध झालेल्या सामन्यात १०९ मीटर लांब षटकार खेचला होता. तर स्पर्धेतील दुसरा लांब षटकार मारण्याचा विक्रमही भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याच्या नावावर आहे. हा षटकार देखील नामिबियाविरुद्ध झालेल्या सामन्यात मारला होता.

आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेत सर्वात लांब षटकार मारणारे फलंदाज

१) हार्दिक पांड्या – १०९ मीटर (भारत)२) शिवम दुबे – १०७ मीटर (भारत)३) रायन बर्ल – १०३ मीटर (झिम्बाब्वे)४) रायन रिकल्टन – १०३ मीटर (दक्षिण आफ्रिका )५) कामिंदू मेंडीस – १०० मीटर (श्रीलंका)

झिम्बाब्वेचा श्रीलंकेवर विजय

या सामन्यातील श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने ७ गडी बाद १७८ धावा केल्या. श्रीलंकेकडून पथूम निसांकाने ६२ धावांची खेळी केली. तर कुसल परेराने २२ धावांची खेळी केली. पवन रथनायकेने २५ चेंडूत ४४ धावा चोपल्या.

श्रीलंकेने दिलेल्या १७८ धावांचा पाठलाग करताना झिम्बाब्वेकडून सलामीला आलेल्या ब्रायन बेनेटने नाबाद ६३ धावांची खेळी केली. मरूमंशीने ३४ धावांची खेळी केली. रायन बर्लने २३ धावा केल्या. कर्णधार सिकंदर रझाने ४५ धावांची खेळी केली. यासह झिम्बाब्वेने ३ चेंडू शिल्लक ठेवून ६ गडी राखून विजय मिळवला.