१० जानेवारीपासून रोजी सुरू झालेला दक्षिण आफ्रिका टी-२० लीगमध्ये, मंगळवारी प्रिटोरिया कॅपिटल्स विरुद्ध जोबर्ग सुपर किंग्ज यांच्यात खेळला गेला. वँडर्स स्टेडियमवर खेळला गेलेला हा सामना जोबर्ग सुपर किंग्जने ६ धावांनी जिंकला, परंतु या सामन्यातील एका झेलचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या सामन्यात नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान जोबर्ग सुपर किंग्जच्या डावाच्या २०व्या षटकात अशी घटना घडली की संघाचे प्रशिक्षकही आश्चर्यचकित झाले. या षटकाच्या चौथ्या चेंडूवर गेराल्ड कोएत्झीने एथन बाकच्या चेंडूवर एक दमदार शॉट लगावला. पण सीमारेषेवर विल जॅकने षटकाराच्या दिशेने जाणारा चेंडू एका हाताने अप्रतिम झेलला. यानंतर जोबर्गचे प्रशिक्षक फ्लेमिंग यांची प्रतिक्रिया पाहण्यासारखी होती.

IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
IPL 2024: लवकरच सगळेजण हार्दिक पंड्याचे गोडवे गातील; कायरॉन पोलार्ड हार्दिकच्या मागे भक्कम उभा
IPL 2024 Chennai Punjab Kings vs Sunrisers Hyderabad Match Updates in Marathi
IPL 2024: हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर सॅम करनने केली रिव्ह्यूची मागणी, करनच्या चतुराईमुळे असा बाद झाला राहुल त्रिपाठी; पाहा VIDEO
Who is Angkrish Raghuvanshi
IPL 2024 : कोण आहे अंगक्रिश रघुवंशी? ज्याने सुनील नरेनच्या साथीने दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांची केली धुलाई
Mathisha Pathirana taking an amazing catch of David Warner
CSK vs DC : मथीशा पाथिरानाने वॉर्नरचा घेतला एका हाताने अप्रतिम झेल, धोनीसह संपूर्ण स्टेडियम झाले चकीत, पाहा VIDEO

विशेष म्हणजे या सामन्यात प्रिटोरिया कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. जोबर्ग सुपर किंग्जने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ६ गडी गमावून १६८ धावा केल्या. जोबर्गसाठी लेस डू प्लॉयने सर्वाधिक ७५ धावा केल्या.

हेही वाचा – IND vs NZ 1st ODI: शानदार शुबमन! केवळ ८७ चेंडूत झळकावले वनडेतील तिसरे शतक

याशिवाय कर्णधार फाफ डू प्लेसिसने २७ आणि रीझा हेंड्रिक्सने ४५ धावा केल्या. गोलंदाजीमध्ये प्रिटोरियाकडून एथन बच्चनने ३, एनरिक नॉर्खियाने २ आणि वेन पारनेलने १ बळी घेतला. यानंतर जॉबर्गकडून मिळालेल्या १६९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना प्रिटोरिया २० षटकांत १६२ धावांत ऑलआऊट झाला. त्यामुळे हा सामना जोबर्ग सुपर किंग्जने ६ धावांनी जिंकला.