आयपीएल २०२३ (IPL 2023) या स्पर्धेला एप्रिलमध्ये सुरुवात होणार आहे. पण ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी आयपीएल टीम मुंबई इंडियन्ससाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या दक्षिण आफ्रिका टी-२० लीगमध्ये, मुंबई इंडियन्सचा फलंदाज डेवाल्ड ब्रेविसने उत्कृष्ट फलंदाजी केली. डेवाल्ड ब्रेविसच्या शानदार फटकेबाजीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यामुळे सर्व क्रिकेट चाहते या युवा फलंदाजाचे जोरदार कौतुक करत आहेत.

विशेष म्हणजे दक्षिण आफ्रिका टी-२० लीगच्या पहिल्या आवृत्तीचा पहिला सामना पार्ल रॉयल्स आणि मुंबई केपटाऊन यांच्यात खेळला गेला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पार्ल रॉयल्स संघाने 20 षटकात ७ गडी गमावून १४२ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात मुंबई केपटाऊनने या लक्ष्याचा पाठलाग करताना चांगली सुरुवात केली. या संघाने १५.३ षटकांत लक्ष्य गाठले आणि शानदार विजय नोंदविला.

Who is fast bowler Sandeep Sharma
IPL 2024 : पाच सामन्यांनंतर परतला आणि मुंबई इंडियन्सच्या डावाला खिंडार पाडणारा संदीप शर्मा कोण?
Champions League Football Barcelona beat Paris Saint Germain sport news
चॅम्पियन्स लीग फुटबॉल: बार्सिलोनाची पॅरिस सेंट-जर्मेनवर मात
riyan parag
वेदनाशामक औषधे घेऊन रियान परागची निर्णायक खेळी!
Shubman Gill fined 12 lakhs
IPL 2024 : गुजरात टायटन्सला पराभवानंतर आणखी एक धक्का, कर्णधार शुबमन गिलला ‘या’ कारणासाठी ठोठावला दंड

युवा फलंदाज डेवाल्ड ब्रेविसने मुंबई केपटाऊनसाठी सर्वाधिक धावा केल्या. ब्रेविसने ४१ चेंडूत ७० धावा चोपल्या. ज्यामध्ये ४ चौकार आणि ५ षटकारांचा समावेश होता. याआधीही ब्रेविसने आयपीएलमध्ये मुंबईकडून खेळताना अनेक उत्कृष्ट खेळी खेळल्या आहेत. आता अशा परिस्थितीत मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना डेवाल्ड ब्रेविसकडून अपेक्षा असेल की त्याची बॅट आयपीएल २०२३ मध्येही अशीच तळपत रहावी.

हेही वाचा – ODI WC Final 2011: ‘२०११च्या फायनलमध्ये धोनीने मला शतक…’, गौतम गंभीरचा मोठा खुलासा

पाठीच्या दुखापतीमुळे जोफ्रा आर्चर अनेक महिने क्रिकेटपासून दूर होता, मात्र दुखापतीनंतर पुनरागमन करताना तो आपल्या जुन्या रंगात दिसला आहे. आर्चरचे पुनरागमन आयपीएल चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण तो आयपीएलमध्ये मुंबईकडून खेळताना दिसणार आहे. तो जसप्रीत बुमराहसोबत गोलंदाजी करताना दिसेल.