T20 World Cup 2026 SA vs AFG Highlights: टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना कायम लक्षात राहणारा असेल. या सामन्यात दोन सुपर ओव्हर झाल्यानंतर अखेरच्या चेंडूवर सामन्याचा निकाल लागला. दक्षिण आफ्रिकेविरूद्ध अफगाणिस्तानने कडवी झुंज दिल्यानंतर अखेरीस रशीद खानच्या नेतृत्त्वाखालील संघाला पराभव पत्करावा लागला होता.
T20 World Cup 2026 SA vs AFG Highlights: दक्षिण आफ्रिका व अफगाणिस्तान सामन्याचे हायलाईट्स
अफगाणिस्तानला दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये विजयासाठी द. आफ्रिकेने २४ धावांचं आव्हान दिलं आहे. मोहम्मद नबी व अझमतुल्ला ओमरझाईची जोडी फलंदाजीसाठी आली अशून केशव महाराज गोलंदाजी करत आहे. पहिला चेंडू डॉट बॉल राहिला, तर दुसऱ्या चेंडूवर नबी झेलबाद झाला.
सुपर ओव्हर
पहिला चेंडू - डॉट
दुसरा चेंडू - विकेट
तिसरा चेंडू - षटकार
चौथा चेंडू - षटकार
पाचवा चेंडू - वाईड बॉल (एका चेंडूत ५ धावांची गरज)
सहावा चेंडू - रहमानुल्ला गुरबाज झेलबाद
दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये दक्षिण आफ्रिकेकडून डेव्हिड मिलर व ट्रिस्टन स्टब्सची जोडी गोलंदाजी करत आहे. तर अझमतुल्ला ओमरझाई गोलंदाजीला आला आहे. यासह दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानला विजयासाठी २४ धावांचं आव्हान दिलं आहे.
सुपर ओव्हर - २३ धावा
पहिला चेंडू - स्टब्सचा षटकार
दुसरा चेंडू - एक धाव
तिसरा चेंडू - दोन धावा
चौथा चेंडू - षटकार
पाचवा चेंडू - षटकार
सहावा चेंडू - २ धावा
सुपर ओव्हरमध्ये सामना बरोबरीत
दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी १८ धावांचं लक्ष्य होतं. अखेरच्या चेंडूवर ७ धावांची गरज असताना ट्रिस्टन स्टब्सने षटकार लगावला आणि सामना बरोबरीत राहिला.
सुपर ओव्हर
पहिला चेंडू - १ धाव
दुसरा चेंडू - षटकार
तिसरा चेंडू - झेलबाद
चौथा चेंडू - चौकार
पाचवा चेंडू - निर्धाव
सहावा चेंडू - षटकार
अफगाणिस्तानकडून सुपर ओव्हरसाठी अजमतुल्ला ओमरझाई व रहमानुल्ला गुरबाज ही जोडी उतरली आहे. तर द. आफ्रिकेकडून लुंगी एनगिडी गोलंदाजी करत आहे. पहिल्या दोन चेंडूत ओमरझाईने १ षटकार व दोन चौकार लगावले. यासह अफगाणिस्तानने सुपर ओव्हरमध्ये १७ धावा केल्या.
अफगाणिस्तानची सुपर ओव्हर
पहिला चेंडू - चौकार
दुसरा चेंडू - षटकार
तिसरा चेंडू - एकेरी धाव
चौथा चेंडू - एकेरी धाव
पाचवा चेंडू - चौकार
सहावा चेंडू - एकेरी धाव
२० व्या षटकातील पहिल्या चेंडूवर रबाडाने नूर अहमदला झेलबाद केलं, पण तो चेंडू नो बॉल राहिला. त्यानंतर दुसरा चेंडू वाईड टाकला. तर पहिला लीगल चेंडू डॉट बॉल राहिला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर नूर अहमदने षटकार लगावला. त्यानंतर ४ चेंडूत ५ धावांची गरज होती. त्यानंतर त्याने सामन्यातील चौथा चेंडू नो बॉल टाकला. दरम्यान लीगल चेंडूवर २ धावांची गरज असताना फजलहक फारूकी दुसरी धाव घेताना धावबाद झाला. यासह सामना १८७ धावांसह बरोबरीत राहिला. आता सुपर ओव्हरमध्ये सामन्याचा निकाल लागेल.
रशीद खान झेलबाद
मार्को यान्सनच्या अखेरच्या षटकात मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात सीमारेषेजवळ झेलबाद झाला. यासह अफगाणिस्तानची विजयाची अखेरची आशा मावळली. आता अफगाणिस्तानला विजयासाठी ९ चेंडूत १९ धावांची गरज आहे. नूर अहमदने येताच षटकार खेचला. पण पुढच्या चेंडूवर एक धाव घेण्याच्या प्रयत्नात मुजीब उर रहमान धावबाद झाला.
१८व्या षटकात स्टब्सचा कमाल झेल
१८व्या षटकात लुंगी एनगिडीच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात अमजतुल्ला ओमरझाई झेलबाद झाला. ट्रिस्टन स्टब्सने सीमारेषेजवळ झेल टिपला, पण त्याचा तोल जाणार कळताच त्याने चेंडू बाहेर टाकला आणि सीमारेषेपलीकडे जाऊन आतमध्ये येत त्याने चेंडू पुन्हा पकडला. आता अफगाणिस्तानला विजयासाठी १३ चेंडूत २४ धावांची गरज आहे.
अफगाणिस्तानला सहावा धक्का
१६व्या षटकात जॉर्ज लिंडाने अफगाणिस्तानला सहावा धक्का दिला. मोहम्मद नबी मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात चेंडू हवेत उंच उडाला आणि मारक्रमने सहज झेल टिपला. यासह आता अफगाणिस्तानला विजयासाठी २९ चेंडूत ४९ धावांची गरज आहे.
केशव महाराजच्या खात्यात मोठी विकेट
केशव महाराजने १३व्या षटकात रहमानुल्ला गुरबाजला झेलबाद करत संघाला मोठी विकेट मिळवून दिली आहे. गुरबाज मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यात उत्कृष्ट फटकेबाजी करत होता. पण मोठा फटका खेळण्याच्या नादात तो झेलबाद झाला. रहमानुल्ला ४२ चेंडूत ४ चौकार व ७ षटकारांसह ८४ धावा करत बाद झाला. तर चौथ्या चेंडूवर दारविश रसूली धावबाद झाल्याने अफगाणिस्तानने पुन्हा एका षटकात २ विकेट्स गमावल्या आहेत.
अफगाणिस्तानच्या १०० धावा पूर्ण
लागोपाठ ३ विकेट्स गमावल्यानंतर रहमानुल्ला गुरबाज व दारविश रसूली यांनी संघाचा डाव सावरला. यासह ११ षटकांत ३ बाद १०० धावांचा पल्ला संघाचा डाव सावरला.
रहमानुल्ला गुरबाजने २६ चेंडूत २ चौकार व ५ षटकारांसह आपलं अर्धशतक पूर्ण केलं आहे. गुरबाजच्या या खेळीसह अफगाणिस्तानचा संघ सामन्यात कायम आहे.
अफगाणिस्तानला सलग तिसरा धक्का
पॉवरप्लेमधील अखेरचं षटक टाकण्यासाठी रबाडा आला आणि त्याने दुसऱ्याच चेंडूवर सदिकउल्ला अटलला झेलबाद केलं. यासह पॉवरप्लेमध्ये अफगाणिस्तानने ३ बाद ५६ धावा केल्या आहेत.
लुंगी एनगिडीने पाचव्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर इब्राहिम झाद्रानला क्लीन बोल्ड केलं आणि संघाला ब्रेकथ्रू मिळवून दिला. यासह अफगाणिस्तानची अर्धशतकी भागीदारी तुटली आहे. तर षटकातील चौथ्या चेंडूवर गुलबदिन नायब स्ट्रेट शॉट खेळताना एनगिडीकडून झेलबाद झाला.
४ षटकांत ५० धावा
रहमानुल्ला गुरबाज व इब्राहिम झाद्रान या दोघांनी शानदार सुरूवात करत ४ षटकांत संघाला ५० धावांचा आकडा गाठून दिला. गुरबाज ३२ धावा तर झाद्रान १९ धावांवर खेळत आहे.
सामन्याला सुरूवात
द. आफ्रिकेने दिलेल्या १८८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी अफगाणिस्तानकडून रहमानुल्ला गुरबाज व इब्राहिम झाद्रान ही जोडी उतरली आहे. लुंगी एनगिडीच्या पहिल्याच षटकात गुरबाजने १३ धावा कुटल्या.
अफगाणिस्तानने द. आफ्रिकेच्या फलंदाजांना झटपट माघारी धाडलं असलं तरी मार्को यान्सनने अखेरच्या षटकांमध्ये कमालीची फटकेबाजी केली. यासह संघाने २० षटकांत ६ बाद १८७ धावा केल्या. तर अखेरच्या चेंडूवर मार्को यान्सन मोठा फटका खेळताना झेलबाद झाला. आता अफगाणिस्तानला विजयासाठी १८८ धावा करायच्या आहेत.
अजमतच्या एका षटकात दोन विकेट्स
१८व्या षटकात अजमतुल्ला ओमरझाई गोलंदाजीसाठी आला. या षटकातील दुसऱ्या चेंडूवर डेवाल्ड ब्रेविस झेलबाद झाला. तर अखेरच्या चेंडूवर ट्रिस्टन स्टब्सने विकेट गमावली. यासह अजमतने या षटकात फक्त ४ धावा देत २ विकेट्स घेतल्या. द. आफ्रिकेने १८ षटकांत ५ बाद १५९ धावा केल्या आहेत.
रशीदच्या १३व्या षटकात मोठी विकेट
रशीद खान १३वं षटक टाकण्यासाठी आला, त्याच्या षटकातील चौथ्या चेंडूवर डीकॉक मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला. तर अखेरच्या चेंडूवर रायन रिकल्टनला पायचीत केलं आहे. रशीद खानचं हे षटक सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरू शकतो. यासह १३ षटकांत संघाने ३ बाद १२७ धावा केल्या. रिकल्टन व डीकॉक यांनी ११४ धावांची भागीदारी रचली.
डीकॉक-रिकल्टन अर्धशतक
क्विंटन डीकॉक व रायन रिकल्टन यांनी अर्धशतकं झळकावली आहेत. डीकॉकने ३४ चेंडूत ५ चौकार व ३ षटकारांसह अर्धशतक पूर्ण केलं. तर रायन रिकल्टनने अवघ्या २३ चेंडूत ५ चौकार व ३ षटकारांसह अर्धशतक झळकावलं. यासह दोघांनी शतकी भागीदारी रचली आहे. यासह संघाने ११ षटकांत १ बाद १११ धावा केल्या आहेत.
अर्धशतकी भागीदारी
डीकॉक व रिकल्टन यांनी संघाचा डाव सावरत अर्धशतकी भागीदारी रचली आहे. रशीद व मोहम्मद नबीच्या गोलंदाजीवर षटकार-चौकारांची आतिषबाजी केली आहे. यासह ८ षटकांत संघाने १ बाद ६४ धावा केल्या आहेत.
पॉवरप्ले
मारक्रम बाद झाल्यानंतर रिकल्टन व डीकॉक यांनी संघाचा डाव सावरला. यासह संघाने ६ षटकांत १ बाद ४३ धावा केल्या आहेत.
अफगाणिस्तानच्या खात्यात पहिली विकेट
अफगाणिस्तानने तिसऱ्याच षटकात द. आफ्रिकेला पहिला धक्का दिला आहे. फजलहक फारूकीच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या तयारीत असताना चेंडू बॅटची कड घेत हवेत उंच उडाला आणि मारक्रम ४ धावा करत झेलबाद झाला.
सामन्याला सुरूवात
अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्याला सुरूवात झाली आहे. दक्षिण आफ्रिकेकडून एडन मारक्रम आणि क्विंटन डीकॉक ही जोडी सलामीला उतरली आहे. तर अफगाणिस्तानकडून फजलहक फारूकीने गोलंदाजीला सुरूवात केलीये.
अफगाणिस्तानची प्लेईंग इलेव्हन
रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), इब्राहिम झाद्रान, गुलबदिन नायब, सेदीकुल्लाह अटल, दरविश रसूली, अजमतुल्ला उमरझाई, मोहम्मद नबी, रशीद खान (कर्णधार), मुजीब उर रहमान, नूर अहमद, फजलहक फारुकी
एडन मारक्रम (कर्णधार), क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), रायन रिकेल्टन, डेवाल्ड ब्रेविस, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, मार्को जॅन्सन, जॉर्ज लिंडे, कागिसो रबाडा, केशव महाराज, लुंगी एनगिडी
नाणेफेक
अफगाणिस्तान व दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-२० वर्ल्डकप सामन्याची नाणेफेक अफगाणिस्तानने जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. यासह दोन्ही संघ प्लेईंग इलेव्हनमध्ये अतिरिक्त फिरकीपटूंसह उतरणार आहे.
