scorecardresearch

Premium

SA vs AUS: विश्वचषक २०२३ पूर्वी दक्षिण आफ्रिकेला बसले दोन मोठे धक्के, कर्णधारासह ‘या’ स्टार गोलंदाजाला झाली दुखापत

South Africa Players Injuries Updates: सध्या ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात एकदिवसीय मालिका खेळवली जात आहे. मात्र मालिकेतील चौथ्या सामन्यापूर्वी आफ्रिकेसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे.

South Africa vs Australia Match Updates
टेंबा बावुमा आणि एनरिक नॉर्टजेला दुखापत (फोटो सोजन्य -प्रोटीस मेन्स ट्विटर)

South Africa vs Australia ODI Series Updates: सध्या दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळली जात आहे. दरम्यान दक्षिण आफ्रिका संघाच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत. २०२३ च्या विश्वचषकापूर्वी कर्णधार टेंबा बावुमासह संघाचे दोन खेळाडू जखमी झाले आहेत. वेगवान गोलंदाज एनरिक नॉर्खिया या दुखापतीमुळे तिसरा एकदिवसीय सामना खेळू शकला नाही, आता तो शेवटच्या दोन एकदिवसीय सामन्यांमधूनही बाहेर आहे.

पाठीच्या दुखापतीमुळे नॉर्खिया ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील उर्वरित सामन्यांमधून बाहेर पडला आहे. नॉर्खियाच्या दुखापतीमुळे विश्वचषकापूर्वी दक्षिण आफ्रिकेसाठी अडचणी निर्माण होऊ शकतात. त्याचवेळी जबरदस्त फॉर्मात असलेला आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमा देखील ताणामुळे मालिकेतील शेवटचा सामना खेळू शकणार नाही. बावुमाच्या जागी एडेन मार्कराम उर्वरित दोन सामन्यांमध्ये आफ्रिकेची जबाबदारी सांभाळेल.

AUS vs WI 2nd Test Match Updates in marathi
AUS vs WI 2nd Test : वेस्ट इंडिजचा ऑस्ट्रेलियावर ८ धावांनी ऐतिहासिक विजय, शमर जोसेफ ठरला विजयाचा शिल्पकार
U19 World Cup 2024 fastest fifty record
U19 World Cup 2024 : ६,६,६,६,४,६…दक्षिण आफ्रिकेच्या स्टीव्ह स्टॉकने ऋषभ पंतचा विक्रम मोडत रचला इतिहास
Pakistan hockey Team Coach Shahnaz Sheikh
Shahnaz Shaikh : पाकिस्तानच्या हॉकी कोचने ऑलिम्पिक पात्रता फेरीतील पराभवासाठी खराब अंपायरिंगला धरले जबाबदार
australian open 2024 carlos alcaraz medvedev enter quarter finals
ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा : अल्कराझ, मेदवेदेवचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश, झ्वेरव्ह, हुरकाझ, झेंग, यास्त्रेमस्काचीही आगेकूच

वेगवान गोलंदाज एनरिक नॉर्खियाच्या दुखापतीबाबत, क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने एक निवेदन जारी केले की, “आफ्रिकन वेगवान गोलंदाज एनरिक नॉर्खिया पाठीच्या दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उर्वरित दोन एकदिवसीय सामन्यांमधून बाहेर पडला आहे. २९ वर्षीय नॉर्खियाने स्कॅन केले आणि तज्ञांचा सल्ला घेतला आणि या आठवड्याच्या अखेरीस प्रोटीज वैद्यकीय संघाच्या देखरेखीखाली गोलंदाजी पुन्हा सुरू करेल.”

हेही वाचा – IND vs BAN: टीम इंडियाच्या खेळाडूंना पाणी घेऊन जाताना किंग कोहलीने अस काही केलं की… विराटचा हा VIDEO पाहून तुम्हाला ही येईल हसू

याशिवाय कर्णधार बावुमाच्या दुखापतीवर क्रिकेट दक्षिण आफ्रिकेकडून एक निवेदन जारी करण्यात आले आहे. कर्णधार किरकोळ जखमी झाला आहे. निवेदनात म्हटले आहे की, “एकदिवसीय कर्णधार टेंबा बावुमा शुक्रवारी सुपरस्पोर्ट पार्क येथे होणाऱ्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात निवडीसाठी उपलब्ध असणार नाही. बावुमाच्या उजव्या हाताला दुखापत झाली असून खबरदारी म्हणून त्याला सामन्यातून बाहेर ठेवण्यात आले आहे.”

हेही वाचा – IND vs BAN: रोहित शर्माला सचिन तेंडुलकरचा मोठा विक्रम मोडण्याची संधी, बांगलादेशविरुद्ध कराव्या लागणार फक्त ‘इतक्या’ धावा

दक्षिण आफ्रिका वनडे मालिकेत पिछाडीवर –

आत्तापर्यंत खेळल्या गेलेल्या ३ वनडे सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलिया २ विजयांसह २-१ ने आघाडीवर आहे. ऑस्ट्रेलियाने पहिले दोन सामने जिंकले होते. त्यानंतर तिसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने मालिकेतील आघाडी कायम राखत १११ धावांनी शानदार विजय संपादन केला.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sa vs aus south africa players temba bavuma and anrich nortje will miss the fourth match due to injury vbm

First published on: 15-09-2023 at 17:42 IST

संबंधित बातम्या

×