दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना शुक्रवारी खेळला गेला. या सामन्यात आफ्रिकन संघाने चांगली कामगिरी करत इंग्लंडचा २७ धावांनी पराभव केला. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि २९८ धावांचे लक्ष्य ठेवले. इंग्लंडचा संघ २७१ धावांवर सर्वबाद झाला. या सामन्यातील पंचाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अशाप्रकारे इंग्लंडला पहिल्या वनडेत २७ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात आफ्रिकेच्या चमकदार कामगिरीची चर्चा होत असतानाच, पंचाच्या बेजबाबदार कृत्याचा एक व्हिडिओही समोर आला आहे. ज्यावर सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे.

IPL 2024 Lucknow Super Giants vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
CSK vs LSG सामन्यानंतर IPL कडून दोन्ही संघांच्या कर्णधारांवर कारवाई, ऋतुराज-राहुलला १२ लाखांचा दंड
Hardik Pandya Slapped With Fine Of 12 Lakh rupees By BCCI
मुंबई इंडियन्सचा विजय सेलिब्रेट करताना हार्दिक पंड्याला धक्का; ‘या’ साठी बीसीसीआयने ठोठावला १२ लाखांचा दंड
Shubman Gill Argument with Umpire during the GT vs LSG match
GT vs LSG : डीआरएसवरून झाला वाद, शुबमनसह गुजरात टायटन्सचे खेळाडू भिडले अंपायरशी, VIDEO होतोय व्हायरल
Virat Kohli and Gautam Gambhir hugging each other
RCB vs KKR : विराट-गौतमने जिंकली सर्वांची मनं, गतवर्षातील वाद विसरुन एकमेकांची घेतली गळाभेट, VIDEO व्हायरल

चेंडूऐवजी अंपायर प्रेक्षकांकडे तोंड करून उभा होता –

५० षटकांचा खेळ खूप मोठा असतो, अशा स्थितीत अंपायरला सतत सक्रिय राहणे अवघड होऊन बसते. इंग्लंडच्या डावात असाच एक प्रकार समोर आला, जेव्हा अंपायर माराईस इरास्मस हे फलंदाजाकडे पाहण्याऐवजी प्रेक्षकांकडे पाहत होते. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

ही घटना इंग्लंडच्या डावात एनरिच नॉर्किया २५ वे षटक टाकायला आल्यावर घडली. या षटकात अंपायर मॅरिस इरास्मस सौद हे लेग अंपयर होते. अशा परिस्थितीत चेंडूची उंची पाहणे आणि बॅटने कट झाला की नाही हे पाहणे काम असते. तसेत दुसऱ्या अंपायरला आऊट किंवा नॉट आउट करण्यास मदत करणे हे त्याचे काम होते, परंतु चेंडूऐवजी ते प्रेक्षकांच्या दिशेने तोंड करुन उभा होते. इतक्यात जेसन रॉयने नॉर्कियाच्या चेंडूवर शॉटही खेळला. बॅटवर चेंडू आदळल्याचा आवाज येताच अंपायर मागे वळून पाहू लागले.

क्रिकेट चाहत्यांकडून व्हिडिओ व्हायरल –

हेही वाचा – IND vs NZ 1st T20: ‘विचार केला नव्हता की…’, पहिल्या सामन्यातील पराभवानंतर हार्दिक पांड्याने दिली प्रतिक्रिया

त्याचवेळी हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. अनेक लोक लिहित आहेत की अंपायरला एकदिवसीय सामन्यात रस नाही, तर अनेक लोक आयसीसीकडे लक्ष देण्याचे आवाहनही करत आहेत. याशिवाय त्यावर अनेक अप्रतिम मीम्सही बनवले जात आहेत.