Sachin Sarjerao Khilari won Silver Medal in Paris Paralympics 2024: पॅरिस पॅरालिम्पिकच्या ७व्या दिवशी भारताच्या सचिन खिलारीने पुरुषांच्या गोळाफेक F46 प्रकारात रौप्य पदक जिंकले आहे. या रौप्य पदकासह, सचिन ४० वर्षांत पॅरालिम्पिकमध्ये गोळाफेक प्रकारात पदक जिंकणारा पहिला भारतीय पुरुष खेळाडू ठरला आहे. यापूर्वी १९८४ मध्ये भारताने पुरुषांच्या गोळाफेकमध्ये पहिले पदक जिंकले होते. याच स्पर्धेत असलेले इतर भारतीय खेळाडू रोहित कुमार १४.१० च्या थ्रोसह नवव्या आणि मोहम्मद यासरने १४.२१ च्या थ्रोसह आठवे स्थान पटकावले.

सचिनच्या या पदकासह भारताच्या पदकांची संख्या २१ झाली आहे. सचिनने १६.३२ मीटर्सच्या आशियाई विक्रमी थ्रोसह दुसरे स्थान पटकावले. कॅनडाच्या ग्रेग स्टीवर्टने सुवर्णपदक जिंकले. क्रोएशियाच्या बाकोविक लुकाने १६.२७ मी फेकसह वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी करत कांस्यपदक जिंकले.

Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”
8th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
८ सप्टेंबर पंचाग: मेष, कुंभसह ‘या’ पाच राशींच नशीब बदलणार इंद्र योग; सुखाच्या सरी बरसणार तर कोणाचे कष्ट वाढणार; वाचा तुमचे भविष्य
Pakistan Former Cricketer Javed Miandad Inzamam Ul aq Slams PCB and Cricket Team for Poor Performance PAK vs BAN
PAK vs BAN: “हा एक वाईट संकेत आहे…” फक्त खेळाडू नाही तर PCB वरही भडकले पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू; जावेद मियांदाद, इंजमाम यांच्या वक्तव्याने वेधले लक्ष
Nitin Gadkari on Shivaji Maharaj Statue
Nitin Gadkari on Shivaji Maharaj Statue: ‘… तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला नसता’, नितीन गडकरींनी दाखवली ‘ती’ चूक
Hasan Mushrif on Sharad pawar
Hasan Mushrif on Sharad Pawar: “पवार साहेब तुमच्याशी वैर नाही, समरजित आता तुझी…”, हसन मुश्रीफांचे प्रत्युत्तर
Narendra modi on Surat Loot
Surat Loot : सूरतेची महाराजांची लूट आणि मोदींचे १० वर्षांपूर्वीचे उद्गार… नक्की ऐका
Hardik Pandya Son Agastya Visits Pandya House First Time After Divorced of Hardik and Natasa
Hardik-Natasa: घटस्फोटानंतर लेक अगस्त्य पहिल्यांदा पोहोचला हार्दिक पंड्याच्या घरी, कृणालच्या पत्नीने शेअर केलेला VIDEO व्हायरल
The flight from Kathmandu to Delhi was hijacked on December 24, 1999.
IC814 Hijacking Case: पाकिस्तानला कॉल आणि ठाकरेंच्या ‘मातोश्री’ला लक्ष्य करण्याची योजना: मुंबई पोलिसांनी IC814 अपहरण प्रकरणाचा शोध नेमका घेतला कसा?

हेही वाचा – PAK vs BAN: “हा एक वाईट संकेत आहे…” फक्त खेळाडू नाही तर PCB वरही भडकले पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू; जावेद मियांदाद, इंजमाम यांच्या वक्तव्याने वेधले लक्ष

सचिनने यापूर्वी वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२४ मध्ये आशियाई विक्रमासह सुवर्णपदक जिंकले होते. ३४ वर्षीय सचिनने दुसऱ्या प्रयत्नात आपली सर्वोत्तम कामगिरी केली आणि १६.३० मीटरचा स्वतःचा आशियाई विक्रम मोडला. जपानमध्ये मे २०२४ मध्ये झालेल्या जागतिक पॅरा-ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकून त्याने हा विक्रम केला. खिलारीचे रौप्यपदक हे सध्या सुरू असलेल्या पॅरा गेम्समध्ये पॅरा-ॲथलेटिक्समध्ये जिंकलेले ११वे पदक आहे.

महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील कारागणी गावात सचिनचा जन्म एका शेतकरी कुटुंबात झाला. सचिनचा शाळेत असताना एक भाषण अपघात झाला होता या अपगातानंतर त्याच्या डाव्या हाताला अपंगत्व आले. २०१५ साली सचिनची पॅरा स्पोर्ट्सशी ओळख झाली आणि त्याने २०१७ मध्ये जयपूर येथे राष्ट्रीय खेळांमध्ये तो सहभागी झाला आणि सुवर्णपदक जिंकले.

हेही वाचा – Hardik-Natasa: घटस्फोटानंतर लेक अगस्त्य पहिल्यांदा पोहोचला हार्दिक पंड्याच्या घरी, कृणालच्या पत्नीने शेअर केलेला VIDEO व्हायरल

गेल्या वर्षी चीनमध्ये झालेल्या आशियाई पॅरा गेम्समध्येही सचिनने सुवर्णपदक पटकावले होते. F46 श्रेणी अशा खेळाडूंसाठी आहे ज्यांच्या हातात कमकुवतपणा आहे, स्नायू कमकुवत आहेत किंवा त्यांच्या हातांची हालचाल कमी आहे. या प्रकारात खेळाडू उभे राहून स्पर्धा करतात.

सचिन खिलारी मेकॅनिकल इंजिनियर

खिलारीने आपल्या क्रीडा कौशल्यासोबतच मेकॅनिकल इंजिनीयर म्हणून शैक्षणिक क्षेत्रातही यश संपादन केले आहे. तो वेगवेगळ्या संस्थांमध्ये व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून काम करतो, विद्यार्थ्यांना त्यांच्या MPSC आणि UPSC परीक्षेच्या तयारीत मदत करतो. सचिनला लहान वयातच त्याच्या आईला गमावले आणि सायकल अपघातात त्याला अपंगत्व आले. अनेक शस्त्रक्रिया करूनही त्याचा हात गँगरीन आणि स्नायूंच्या शोषामुळे पूर्ववत ठीक होऊ शकला नाही.

हेही वाचा – Paris Paralympics 2024: भारताची पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये रेकॉर्डब्रेक कामगिरी, अवघ्या सहा दिवसांत सर्वाधिक पदकं जिंकण्याचा केला विक्रम

गोळाफेकमध्ये तिसरे पदक

पॅरालिम्पिकच्या इतिहासात गोळाफेकमध्ये पदक जिंकणारा सचिन खिलारी हा केवळ तिसरा भारतीय खेळाडू आहे. यापूर्वी १९८४ मध्ये जोगिंदर सिंग बेदीने कांस्यपदक जिंकले होते आणि महिला धावपटू दीपा मलिकने २०१६ च्या रिओ पॅरालिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले होते. आता हे तिसरे पदक ८ वर्षांनंतर आले आहे.