..तर भारत विश्वावर राज्य करेल – सचिन

‘‘या संघामध्ये चांगला ताळमेळ आहे.

मुंबई पोलीस जिमखाना आयोजित क्रिकेट स्पर्धेच्या पारितोषिक वितरणाच्या कार्यक्रमात सचिन उपस्थित होता.
सध्याचा भारतीय कसोटी संघ आणि कर्णधार विराट कोहली यांचे भारताचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकरने कौतुक केले आहे. जर हा संघ  असाच दहा वर्षांपर्यंत खेळत राहिला तर भारत क्रिकेट विश्वावर राज्य करेल, असे मत सचिनने व्यक्त केले आहे.

‘‘या संघामध्ये चांगला ताळमेळ आहे. या संघातील सर्वात चांगली गोष्ट म्हणजे जवळपास सर्वच खेळाडू युवा आहेत. त्यामुळे त्यांनी सातत्यपूर्ण कामगिरी केल्यास ते ८-१० वर्षे खेळू शकतील. जर हाच संघ कायम राहिला तर भारत क्रिकेट विश्वावर राज्य करू शकेल,’’ असे सचिन म्हणाला.

सध्या सुरू असलेला न्यूझीलंडविरुद्धचा कसोटी सामना ही भारताची पाचशेवी लढत आहे. या पाचशे लढतींपैकी ४० टक्के कसोटी सामने सचिन खेळला आहे. सध्याच्या संघाविषयी सचिन म्हणाला, ‘‘संघामध्ये काही आक्रमक खेळाडू आहेत, तर काही संयतपणे खेळणारेही आहेत. त्यामुळे संघात चांगला समन्वय पाहायला मिळतो. हा संघ चांगली कामगिरी करू शकतो. पण त्यांनी तंदुरुस्त राहायला हवे.’’

तो पुढे म्हणाला की, ‘‘क्रिकेटमध्ये फलंदाजी आणि गोलंदाजीचा योग्य समतोल असायला हवा. पण सध्या हा समतोल दिसत नाही. गोलंदाजीवर फलंदाजी वरचढ होताना दिसते. ट्वेन्टी-२० क्रिकेट हा फलंदाजांचाच खेळ आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये तीनशे धावांचे आव्हानही सुरक्षित वाटत नाही. त्यामुळे क्रिकेटचा एक प्रकार असा असायला हवा, जिथे गोलंदाजी फलंदाजीवर वरचढ ठरू शकेल.’’

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sachin tendulkar

Next Story
अ‍ॅटलेटिकोने बार्सिलोनाला बरोबरीत रोखले
फोटो गॅलरी