Sachin Tendulkar Amitabh Bachchan Viral Video: क्रिकेटचा देव अशी ओळख असणारा सचिन तेंडुलकर व बॉलीवूडमधील बिग बी अभिषेक बच्चन यांचा एक व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे. इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगदरम्यान हे दोघेही दिग्गज फिंगर क्रिकेट खेळताना दिसले. इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगच्या तिसऱ्या सीझनला ९ जानेवारीपासून सुरूवात झाली आहे. १२ जानेवारीला अमिताभ बच्चन व सलमान खान यांच्या संघातील सामना पाहण्यासाठी बिग बी उपस्थित होते. यादरम्यानचा सचिनबरोबर फिंगर क्रिकेट खेळतानाचा हा व्हीडिओ आहे.
१२ जानेवारीला अमिताभ बच्चन आणि सलमान खान यांच्या संघांमध्ये टक्कर झाली. दिल्ली सुपरहिरोजने ‘माझी मुंबई’चा २३ धावांनी पराभव केला. बिग बींच्या संघाला मैदानावर पराभव पत्करावा लागला. तर दुसरीकडे बिग बी सचिनबरोबर क्रिकेट खेळत होते, ज्याचा व्हीडिओ समोर आला आहे.
अमिताभ बच्चन यांनी एक्सवर व्हिडिओ पोस्ट केला आणि कॅप्शन दिलं: “क्रिकेटच्या देवासोबत फिंग क्रिकेट खेळताना.” हा व्हिडिओ आयएसपीएल सीझन ३ मधील आहे, या फिंगर क्रिकेटदरम्यान ते दोघेही प्रथम टेस्ट बॉल खेळले. पहिल्या फेरीत अमिताभ बच्चन यांनी गोलंदाजी केली आणि ते सामना जिंकले. त्यानंतर दुसरा फेरी आली, जिथे बिग बींना फलंदाजीची संधी देण्यात आणि सचिन तेंडुलकरला जिंकण्यासाठी १३ धावांचं आव्हान मिळालं. सचिन तेंडुलकरने झटपट १२ धावा केल्या, तीन चेंडूत एक धाव हवी होती. पण अखेर अमिताभ बच्चन यांनी सामना बरोबरीत असल्याचं घोषित केलं. या फिंगर क्रिकेटमध्ये दोघेही हाताच्या बोटांनी धावा करत होते.
इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग (ISPL) ही एक T10 टेनिस बॉल क्रिकेट लीग आहे. या स्पर्धेला २०२४ मध्ये सुरूवात झाली होती. सलमान खान हा लीगचा ब्रँड अॅम्बेसेडर आहे आणि दिल्ली संघाचा मालक देखील आहे. या क्रिकेट लीगमध्ये अक्षय कुमार, करीना कपूर खान, सैफ अली खान, अजय देवगण, हृतिक रोशन आणि राम चरण यांच्याही संघांचा सहभाग आहे.
सचिन तेंडुलकर देखील या स्पर्धेच्या समितीचा एक मुख्य सदस्य आहे. खरं तर, अमिताभ बच्चन यांची ‘माझी मुंबई’ हा संघ इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग (ISPL) च्या सीझन १ च्या अंतिम फेरीत पोहोचली होती. ते दुसऱ्या सीझनचे विजेते होते.
