Sachin Tendulkar 50th Birthday: १०० आंतरराष्ट्रीय शतकांसह, सचिन तेंडुलकर हा क्रिकेटच्या मैदानातील सर्वात महान फलंदाज आहे. मास्टर ब्लास्टरने वयाच्या १६ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. खेळाच्या तीनही फॉरमॅटमध्ये १०० शतके झळकावणारा तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिला क्रिकेटपटू ठरला. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सचिनच्या नावावर ४९ शतके आहेत. सचिनने आपल्या ७९व्या सामन्यात पहिले एकदिवसीय शतक झळकावले. कसोटी क्रिकेटमध्ये, १९९० मध्ये ओल्ड ट्रॅफर्ड येथे इंग्लंडविरुद्ध पहिले शतक नोंदवले. सचिन आज त्याचा ५० वा वाढदिवस साजरा करत असताना, महान क्रिकेटरच्या १०० आंतरराष्ट्रीय शतकांची सुरुवात करून देणाऱ्या क्षणावर नजर टाकूया…

सचिन तेंडुलकरने स्वतः आपल्या इंस्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केला होता. “माझ्या पहिल्या शतकाची आठवण करून देणारा माझ्या आयुष्यातील तो एक खास दिवस.” असे कॅप्शन देत सचिनने आठवणींना उजाळा दिला. तसं तर सचिनच्या फॅन्सना माहित असेलच पण पुन्हा एकदा सांगायचं तर, सचिन, आयुष्यातील पहिले शतक वयाच्या १७ व्या वर्षी खेळला होता. १९९० मध्ये इंग्लंडच्या विरुद्ध सचिनने १८९ बॉलमध्ये ११९ धावा काढून भारताला जिंकण्यासाठी मोठी मदत केली होती. त्याच सामन्यातील हा क्षण…

Video: सचिनच्या आयुष्यातील पहिलं शतक

हे ही वाचा<< “अर्जुनला ‘या’ प्रसंगाची आठवण करून देऊ नका”, सचिन तेंडुलकरने सांगितला पहिल्या विकेटचा किस्सा

दरम्यान, मास्टर ब्लास्टर सचिनच्या नावे आजवर अनेक रेकॉर्ड्स आहेत. त्या रेकॉर्ड्सच्या कित्येकपट जास्त त्याच्या चाहत्यांची संख्या आहे. काही दिवस आधीपासूनच सचिनवर शुभेच्छांचा वर्षाव सुरु आहे. आज त्याच्या खास दिवशी सर्व क्रिकेटप्रेमींकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!